संत सावता महाराज

संत सावता महाराज हे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत होते-हभप सागर महाराज

Saint Savata Maharaj: अकोला बायपास भागातील छत्रपती संभाजी नगर, बळसोंड येथे श्री विठ्ठल-रुख्मणी व श्री सत सावता महाराज यांची मुर्ती प्राणप्रतिष्ठा यांच्यासह कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

संत सावता महाराज हे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत होते-हभप सागर महाराज

Saint Savata Maharaj

हिंगोली (Saint Savata Maharaj) : शहराजवळ असलेल्या अकोला बायपास भागातील छत्रपती संभाजी नगर, बळसोंड येथे श्री विठ्ठल-रुख्मणी व श्री सत सावता महाराज यांची मुर्ती प्राणप्रतिष्ठा यांच्यासह कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ११ ऑगस्ट रोजी हभप भागवताचार्य व शिवपुराण कथाकार सागर महाराज पारिसकर, वाशिम म्हणाले की, संत सावता माळी हे वारकरी संप्रदायातील एक क्षेष्ठ संत होते. यानी कर्म हाच ईश्वर आहे असा संदेश दिला आहे.

हिंगोली शहरातील अकोला  बायपास भागात छत्रपती संभाजी नगर परिसरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व मुर्ती नगर प्रदीक्षणा व देवता स्थापना यासह कीर्तन सोहळा व महाआरती असे विविध कार्यक्रम ८ ते ११ ऑगस्ट या दरम्यान घेण्यात आले. यावेळी आचार्य वे.मु.सुरेशदेव केदारे गुरू व त्यांचे सहकारी यांनी या सोहळ्यात सहभाग घेत संत सावता महाराज यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला. १० ऑगस्ट रोजी प्राणप्रतिष्ठा व ११ ऑगस्ट रोजी कीर्तन सोहळा व महाआरती असे कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी भागवताचार्य व शिवपुराण कथाकार हभप श्री सागर महाराज पारिसकर, वाशिम यांनी कीर्तनातुन सांगितले की, संत सावता महाराज हे पंढरीला गेले नाहीत कारण त्यांचा विश्वास होता की, देवकर्मात आणि भक्ताच्या अंतःकरणात असतो त्याचे विचार सर्व समाजानी अंगीकारावेत असे आवाहन ही कीर्तनातुन यावेळी करण्यात आले. यावेळी हभप ओमप्रकाश नागुलकर गुरूजी यांनी श्री विठ्ठल-रुख्मणी व श्री संत सावता महाराज यांच्या जिवनावर मार्गदर्शन केले.  

या (Saint Savata Maharaj) शेवटच्या कीर्तन सोहळ्यात व महाआरतीला आ. संतोष बांगर,माजी आ. गजानन घुगे, नगर परिषद गट नेता श्रीराम बांगर, उपनगराध्यक्ष अ.माबुद बागवान, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर,युवा सेनेचे जिल्हा प्रमुख राम कदम, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा हिंगोली नगरसेवक  चंद्रकांत लव्हाळे, माजी जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, नगरसेवक गुड्डु बांगर, नगरसेवक नाना नायक, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पु चव्हाण, माजी जि.प.सदस्य संतोष गोरे, संदिप काळे, सोपान शिंदे,  अनिकेत लव्हाळे, आत्माराम सातव, बळीराम सातव, वनिताताई गुंजकर, सुवर्णा गाभणे, सखाराम सारसकर, लिंबाजी थोरे, शाम राऊत , सि.ए. सुभाष पोपळघट, कैलास धामणे, बालाजी सोनुने, सुभाष कदम, वसंता वाघ, राजू लव्हाळे, विश्वास वानखेडे, देवकर, बाळु फंदे, कैलास काळे, राजु सातव, रमेश काळे, बापुराव काळे, स्वराज वाघ, नारायण धामणे,  विठ्ठल सारसकर, के.टी.काळे, उदगिरे,  पांडुरंग नाईक, किसन टेमकर, पारिसकर, भागवत काळे, अशोक बंडे आदींची उपस्थिती होती.  दरम्यान या प्राणप्रतिष्ठा व कीर्तन सोहळ्याला हजारो महिला -पुरूष, भाविक-भक्त उपस्थित होते. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026