हिंगोली जिल्हा पोलिस दल

हिंगोली जिल्हा पोलिस दलातील अधिकार्‍यांचा खांदेपालट

Hingoli Police Force: हिंगोली जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांनी ४ जून २०२४ रोजी १६ पोलिस निरीक्षक आणि सहाय्यक पोलिस निरीक्षकांची स्थानांतरीत करण्यात आलेल्या बदलांबद्दल आदेश जारी

हिंगोली जिल्हा पोलिस दलातील अधिकार्‍यांचा खांदेपालट

Hingoli Police Force

 

जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांनी काढले आदेश
बदल्यांमध्ये 16 पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश 

हिंगोली (Hingoli Police Force) : जिल्हा पोलिस दलातील १६ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या संदर्भात जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांनी ४ जून रोजी आदेश काढले आहेत. जिल्ह्यांतर्गत झालेल्या बदल्यामध्ये हिंगोली शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक संदिप खंडेराव मोदे यांची जिल्हा विशेष शाखा हिंगोली तर जिल्हा विशेष शाखेमधील पोलिस निरीक्षक जमीर अब्दुल गणी नाईक यांची कळमनुरी पोलिस ठाणे, कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश मारोतराव माकोडे यांची पोलिस नियंत्रण कक्ष हिंगोली येथे बदली करण्यात आली.

तसेच बदलीने नव्याने जिल्ह्यात आलेले (Hingoli Police Force) पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह बहादुरसिंह ठाकुर यांची हिंगोली शहर ठाणे, आखाडा बाळापुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णुकांत तुकाराम गुठ्ठे यांची हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे तर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामकुमार परमेश्वर डोंगरे यांची औंढा नागनाथ पोलिस ठाणे हिंगोली शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक शरद सुभाष मरे यांची आखाडा बाळापुर पोलिस ठाणे येथे बदली करण्यात आली.

त्याच प्रमाणे कुरुंदा ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास महाजन निरदोडे यांची वसमत ग्रामीण, जिल्ह्यात नव्याने आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शिवाजी पुरी यांची कुरुंदा पोलिस ठाणे, नव्याने जिल्ह्यात आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप आनंदराव बोरकर यांची हट्टा पोलिस ठाणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आयुब हिराजी शेख यांची औंढा नागनाथ पोलिस ठाणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक उमाकांत वैजनाथ पुणे यांची कळमनुरी पोलिस ठाणे तर नवीन आलेले (Hingoli Police Force) सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत शिवलिंग आरसेवार यांची सायबर सेल  व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली येथे बदली करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे या पुर्वी गोरेगाव पोलिस ठाण्यात रुजु झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत उद्धव भिंगारे यांच्याही अधिकृत बदलीचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांनी काढले आहे. बदलीच्या ठिकाणी तात्काळ कार्यभार स्विकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संबंधित सामग्री

हिंगोलीत आयजींच्या दौर्‍यामुळे पोलिसांचे छापे; २६ जुगार्‍यांवर गुन्हे दाखल

हिंगोलीत आयजींच्या दौर्‍यामुळे पोलिसांचे छापे; २६ जुगार्‍यांवर गुन्हे दाखल

Hingoli Police Raids: नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे आज २० ऑगस्टला हिंगोलीत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये गुन्हे आढावा व जनसंवाद बैठक त्यानंतर कळमनुरी पोलिस..

Aug 19, 2026
जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकार्‍यांचा खांदेपालट; आणखी बदल्या होणार

जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकार्‍यांचा खांदेपालट; आणखी बदल्या होणार

Hingoli Police Officer: सपोनि उमाकांत पुणे यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी काढले आहेत. जिल्ह्यात आणखी काही पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या होणार असल्याचे संकेत

Aug 09, 2026
हिंगोली जिल्हा निर्मितीनंतर जिल्ह्याला आतापर्यंत लाभले १९ पोलीस अधीक्षक

हिंगोली जिल्हा निर्मितीनंतर जिल्ह्याला आतापर्यंत लाभले १९ पोलीस अधीक्षक

Hingoli Police: जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ रोजी झाली आणि त्यानंतरपासून जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेची धुरा सांभाळण्यासाठी आतापर्यंत १९ पोलीस अधीक्षकांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला

Jul 06, 2026
हिंगोलीचे नूतन पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी स्विकारला पदभार

हिंगोलीचे नूतन पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी स्विकारला पदभार

SP Shrenik Lodha: हिंगोली जिल्ह्यांत नूतन पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी २५ जून रोजी हिंगोलीच्या जिल्हा पोलिसाधिक्षक पदभार स्वीकारला.

Jun 25, 2026