मे महिन्यातील उल्लेखनीय कामगिरीसाठी गौरव
हिंगोली (Hingoli Police Force) : प्रत्येक महिन्याला उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याच्या उपक्रमांतर्गत मे २०२६ महिन्यातील कामगिरीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी कर्तव्यदक्ष अधिकारी व अंमलदारांच्या नावांची घोषणा केली. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील २४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी कौतुकास्पद कामगिरीसाठी गौरव करण्यात आला.
मुद्देमाल निर्गतीमध्ये हट्टा (Hingoli Police Force) पोलीस ठाण्याचे सपोनि संग्राम जाधव आणि पोहेकॉ भागोराव दिंडे यांनी उत्कृष्ट काम केले. गुन्हे निर्गतीसाठी बासंबा पोलीस ठाण्याचे सपोनि विकास आडे, ग्रेड पोउपनि मदन गव्हाणे आणि पोहेकॉ व्ही. एस. पोले यांची निवड झाली. CCTNS डाटा इंट्रीमध्ये हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोनि संदिप मोदे, पोउपनि आनंद बनसोडे, पोहेकॉ केशव पुंड आणि मपोशि सुमन काळे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
अपराध सिद्धीसाठी कुरुंदा पोलीस ठाण्याचे सपोनि माधव पुरी आणि पोहेकॉ मारोती कऱ्हाळे यांचा गौरव झाला. प्रतिबंधक कारवाईत सेनगाव पोलीस ठाण्याचे सपोनि दिपक मस्के आणि पोउपनि रविकिरण खंदारे यांनी चांगले काम केले. समन्स वॉरंट बजावणीमध्ये गोरेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि हनुमंत भिंगारे, पोहेकॉ इम्रान खान आणि पोशि कानबा शिंदे यांचा समावेश आहे.
डायल ११२ सेवेमध्ये सेनगाव पोलीस ठाण्याचे सपोनि दिपक मस्के, पोशि अनिल जांबुतकर आणि डायल ११२ पो.नि.कक्षाचे पोशि माधव कोरडे यांनी तत्पर सेवा दिली. CCTNS जिल्हा कामगिरीमध्ये CCTNC शाखेचे पोहेकॉ राजु हमाणे, पोशि राहुल तडकसे आणि मपोशि पुजा जाधव यांची निवड करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन (भा.पो.से.) यांनी सर्व गौरवप्राप्त अधिकारी व अंमलदारांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. दरमहा उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान केल्याने इतर कर्मचाऱ्यांना देखील प्रेरणा मिळते आणि (Hingoli Police Force) पोलीस दलाची कार्यक्षमता वाढते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.