बिबट्या पायाचे ठसे

तळणी-लिंगदरी शिवारात आढळले बिबट्याच्या पायाचे ठसे

Leopard paw prints: हिंगोलीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या तळणी शिवारातील लिंगदरी फाट्याच्या मागील परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे..

तळणी-लिंगदरी शिवारात आढळले बिबट्याच्या पायाचे ठसे

Leopard paw prints

हिंगोली (Leopard paw prints) : हिंगोलीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या तळणी शिवारातील लिंगदरी फाट्याच्या मागील परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या १० वर्षांपासून सर्पमित्र म्हणून कार्य करीत असलेले विश्वा जावळे आणि त्यांचे सहकारी शुभम जावळे यांना वरुड (चक्रपाण) येथील पुष्कर संतोष देशमुख यांनी फोन करून माहिती दिली की, त्यांनी प्रत्यक्ष बिबट्या पाहिला आहे.

माहिती मिळताच सर्पमित्र विश्वा जावळे आणि शुभम जावळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, त्या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे स्पष्टपणे आढळून आले. या घटनेमुळे तळणी आणि लिंगदरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सर्पमित्र विश्वा जावळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही घाबरून जाऊ नये, परंतु सतर्कता बाळगावी. आपली जनावरे आणि लहान मुलांना घराबाहेर एकटे जाऊ देऊ नये. तसेच रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे. वनविभागाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन पाहणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

टैग्स: Leopard paw prints