जल जीवन मिशन योजना

पाणी टंचाईग्रस्त गावाचा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडून आढावा 

Jal Jeevan Mission: हिंगोली जिल्ह्यात जल जीवन मिशन व घरकुल योजनेवर विशेष बैठक आयोजित केली गेली, ज्यात सीईओ विवेक गायकवाड यांनी पाणीपुरवठा व महिलांच्या रोजगारावरील प्रभावाच्या मुद्द्यांवर भर दिला.

पाणी टंचाईग्रस्त गावाचा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडून आढावा 

Jal Jeevan Mission

 

जल जीवन व घरकुल योजनेचा आढावा

​हिंगोली (Jal Jeevan Mission) : जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेता जल जीवन मिशन योजना बाबत तालुक्यातील 111 ग्रामपंचायतीचा आढावा घेण्यात आला जल जीवन मिशन योजनाची कामे पूर्ण करून गावकऱ्यांना पाणी द्या असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले आहेत. (Jal Jeevan Mission) हिंगोली पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात आयोजित 'जल जीवन मिशन' घरकुल व एकल महिला आढावा बैठकीत ते बोलत होते.
​
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गडापोड, गट विकास अधिकारी माया वानखडे, सहाय्यक गट विकास अधिकारी विष्णू भोंजे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ गणेश जोगदंड यांची उपस्थिती होती. गावातून तक्रार येणार नाही, याची काळजी घ्यावी. गावातील लोकांच्या तक्रारी गावातच सोडविण्यात याव्यात चांगल्या कामाला नेहमी प्रोत्साहन दिले पाहिजे आणि सर्वांचा सहभाग घेऊन एकत्रपणे काम केले पाहिजे असा संदेश या बैठकीमध्ये त्यांनी दिला आणि गावकऱ्यांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा कसा होईल यावर भर द्यावा.

महिलांची पायपीट थांबवा; रोजगारावर होतोय परिणाम

​पाणी टंचाईचा सामाजिक परिणाम अधोरेखित करताना गायकवाड यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "अनेक गावांत महिलांना पाण्यासाठी ३-४ तास खर्च करावे लागत आहेत. यामुळे त्यांचा वेळ वाया जाऊन त्यांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. जनतेला शुद्ध आणि वेळेवर पाणी मिळणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांची परवड थांबवण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे." 

बैठकीतील महत्त्वाचे निर्देश:
​मिशन मोडवर काम: सर्व 'ड्राय सोर्स' (कोरडे पडलेले स्त्रोत) हे "जल तारा" उपक्रमांतर्गत पुनरुज्जीवित करावेत. हे काम मिशन मोडवर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
​ ग्राम पंचायत अधिकारी यांनी गाव नकाशा तयार करून गावातील सर्व पाणी स्त्रोत रेखांकन करून 15 दिवसात गाव नकाशे तयार करण्याचे  आदेश दिले व संभाव्य पाणी टंचाई च्या अनुषंगाने करावयाच्या आवश्यक तरतुदीची  माहिती अद्यावत करण्याचे निर्देश दिले.

​याचबरोबर घरकुल योजनेचा (Jal Jeevan Mission) सविस्तर आढावा घेण्यात आला. घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देणे गायरन व इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी विहित मुदतीत घरकुल पूर्ण करून त्याचा लाभ वेळेत दिला पाहिजे असे निर्देश सीईओ विवेक गायकवाड यांनी दिले. ​बालसंगोपन अंतर्गत 2250 रुपये प्रति महा मुलींना शिक्षण घेण्यासाठी शासनाकडून देण्यात येते त्यामुळे हे काम वेळेत करावे.  एकल महिलांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात यावे आशा सूचना देण्यात आल्या. यावेळी तालुक्यातील ग्राम पंचायत अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026