हिंगोली (Hingoli Ganpati Visarjan) : श्रींची स्थापना होऊन पाच दिवस उलटले. १२ व्या दिवशी श्री विसर्जन होणार असल्याने हिंगोलीतील श्री विसर्जन स्थळाची पाहणी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी शुक्रवारी केली. यावेळी त्यांनी काही मार्गदर्शक सूचना दिल्या. हिंगोली शहरातील महादेववाडी भागातून कयाधू नदीमध्ये अनेक श्रींचे प्रामुख्याने विसर्जन होते. यासोबतच पुसेगाव येथील इंदिरा सहकारी साखर कारखान्याच्या इमारत आवारातील विहिर, तिरूपती नगरातील तिरूमला लॉन्स जवळील विहिर या ठिकाणी श्री विसर्जन होणार आहे.
हिंगोली शहरामध्ये १० ४ ठिकाणी श्रींची स्थापना १४ सप्टेंबरला करण्यात आली आहे. यंदाचा गणेश उत्सव १२ दिवसाचा असल्याने शहरातील अनेक श्रींचे टप्याटप्याने विसर्जन केले जाते. यावर्षी शिर्रेहक शहा बाबा दर्गाह तलावाचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणी श्रींचे विसर्जन होणार नाही. या श्री विसर्जन निमित्ताने १८ सप्टेंबर शुक्रवार रोजी पोलिस अधिक्षक डॉ.श्रेणिक लोढा यांनी श्री विसर्जन स्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर यांच्यासह शेख इम्रान, श्रीराम जैताडे, विक्की उरेवार यांची उपस्थिती होती.
हिंगोली गणपती विसर्जन
हिंगोलीतील श्री विसर्जन स्थळाची पोलिस अधिक्षकांनी केली पाहणी
Hingoli Ganpati Visarjan: श्रींची स्थापना होऊन पाच दिवस उलटले. १२ व्या दिवशी श्री विसर्जन होणार असल्याने हिंगोलीतील श्री विसर्जन स्थळाची पाहणी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी शुक्रवारी...
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Hingoli Ganpati Visarjan
टैग्स:
Hingoli Ganpati Visarjan