​​​​​​​पुणे हातभट्टी दुर्घटनेनंतर राज्यभर कारवाईचा धडाका, हिंगोलीत अवैध दारूविरोधात 7 दिवसांत 37 गुन्हे दाखल

पुणे जिल्ह्यात विषारी हातभट्टीदारू सेवनामुळे झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अवैध मद्यनिर्मिती व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे.

​​​​​​​पुणे हातभट्टी दुर्घटनेनंतर राज्यभर कारवाईचा धडाका, हिंगोलीत अवैध दारूविरोधात 7 दिवसांत 37 गुन्हे दाखल

Hingoli Excise Department

हिंगोली (Hingoli Excise Department) : पुणे जिल्ह्यात विषारी हातभट्टीदारू सेवनामुळे झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अवैध मद्यनिर्मिती व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या सूचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक आदित्य गो. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 29 मे ते 5 जून या कालावधीत व्यापक मोहीम राबवण्यात आली.  

राज्य उत्पादन शुल्क हिंगोली विभागाने या मोहिमेदरम्यान संपूर्ण जिल्ह्यात छापे टाकून अवैध मद्य विक्री, वाहतूक तसेच गावठी दारू निर्मिती अड्ड्यांवर कारवाई केली. या कारवाईत महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत 37 आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.  

कारवाईदरम्यान देशी मद्याच्या 180 मिलीच्या 444 बाटल्या, हातभट्टी दारू 154.5 लिटर, रसायन 660 लिटर व 3 दुचाकी वाहने असा एकूण 2,41,810 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  

ही मोहीम अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोहन मातकर, भरारी पथक निरीक्षक रमेश चाटे, दुय्यम निरीक्षक टी.बी. शेख, कृष्णकांत पुरी, प्रदिप गोणारकर, ज्योती गुट्टे, स.दु.नि. कांबळे, जवान आडे, राठोड, चव्हाण, दिनेश राठोड, टेके, वाहनचालक वाघमारे व इतर कर्मचाऱ्यांनी पार पाडली.  

राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही अवैध मद्य खरेदी करू नये. तसेच हिंगोली जिल्ह्यात अवैध मद्य, बनावट मद्य, गावठी दारू निर्मिती अड्डे किंवा विक्रीची माहिती असल्यास विभागाशी संपर्क साधावा. यासाठी 02456-220106, टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001133 वर माहिती देता येईल.

संबंधित सामग्री

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर 6.15 लाखांच्या अनुदान घोटाळ्याचा पर्दाफाश; कळमनुरीच्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्यावर गुन्हा

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर 6.15 लाखांच्या अनुदान घोटाळ्याचा पर्दाफाश; कळमनुरीच्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्यावर गुन्हा

कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या अतिवृष्टी अनुदानाच्या वितरणात झालेल्या गैरव्यवहाराविरोधात आवाज उठवल्यानंतर तब्बल 6.15 लाख रुपयांच्या अनुदान घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे.

Jul 09, 2026
जवळा बाजारात हातभट्टीवर पोलिसांचा छापा; १०० लिटर सडके रसायन जप्त, गुन्हा दाखल

जवळा बाजारात हातभट्टीवर पोलिसांचा छापा; १०० लिटर सडके रसायन जप्त, गुन्हा दाखल

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील पारधी वाडा भागात गावठी हातभट्टी दारू गाळली जात असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Jun 13, 2026
पीएलएफएस व एएसयूएसई राष्ट्रीय सर्वेक्षणांचा हिंगोलीत शुभारंभ

पीएलएफएस व एएसयूएसई राष्ट्रीय सर्वेक्षणांचा हिंगोलीत शुभारंभ

राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण सर्वेक्षणांचा शुभारंभ गुरुवारी (१२ जून) जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते माहितीपत्रकाचे विमोचन करून करण्यात आला.

Jun 12, 2026
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणासाठी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करण्याचे आवाहन

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणासाठी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करण्याचे आवाहन

बैठकीत प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (Booth Level Agent - BLA) नियुक्त करण्याबाबत राजकीय पक्षांना आवाहन करण्यात आले.

Jun 10, 2026