हिंगोली इव्हीएम मशीन

हिंगोली जिल्ह्यात नव्याने ५ हजार १०० इव्हीएम मशीन दाखल

Hingoli EVM machine:

हिंगोली जिल्ह्यात नव्याने ५ हजार १०० इव्हीएम मशीन दाखल

Hingoli EVM machine

 

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी केला जाणार वापर

हिंगोली (Hingoli EVM machine) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात नव्याने ५ हजार १०० ईव्हीएम मशीन दाखल झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या मशीन उपलब्ध करण्यात आल्या असून त्या हैदराबाद येथून मागविण्यात आल्या आहेत. 

जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएम मशीनवर घेण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्ह्याला नव्या ईव्हीएम मशीनचे वाटप केले आहे. त्याचाच भाग म्हणून हिंगोली जिल्ह्याला ५ हजार १०० मशीनचा साठा प्राप्त झाला आहे. या सर्व मशीन सध्या जिल्हा मुख्यालयातील सुरक्षित स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या असून त्यांची तपासणी व फर्स्ट लेव्हल चेकिंग ची प्रक्रिया लवकरच घेण्यात येणार आहे. निवडणूक विभागाकडून मशीनची नोंदणी, सुस्थिती तपासणी व प्रशिक्षणासाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता असून त्यापूर्वी ईव्हीएम मशीनची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

 भविष्यात आरक्षणाची प्रक्रीया पार पडल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका घेतल्या जाणार आहेत. या निवडणूकीकरीता उपलब्ध झालेल्या १७०० सीयू व ३४०० बीयू अशा ५ हजार १०० इव्हीएम मशीनचा वापर केला जाणार आहे

टैग्स: Hingoli EVM machine