खा. रामराव वडकुते यांच्याकडून भूकंपग्रस्त पांगरा शिंदेची पाहणी, भूकंपरोधक विकासाचे आश्वासन

 हिंगोली जिल्ह्यात 11 जून 2026 रोजी सकाळी 8.45 वाजता 4.7 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला.

खा. रामराव वडकुते यांच्याकडून भूकंपग्रस्त पांगरा शिंदेची पाहणी, भूकंपरोधक विकासाचे आश्वासन

Hingoli Earthquake

हिंगोली (Hingoli Earthquake) : हिंगोली जिल्ह्यात 11 जून 2026 रोजी सकाळी 8.45 वाजता 4.7 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव असल्याचे बोलले जात आहे. या भूकंपामुळे गावातील कच्च्या मातीची काही घरे कोसळली, तर अनेक पक्क्या घरांना मोठे तडे गेले आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार रामरावजी वडकुते यांनी  पांगरा शिंदे गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व धीर दिला. “येणाऱ्या काळात पांगरा शिंदे गावात भूकंपरोधक विकास कामे केली जातील. नागरिकांनी घाबरू नये, प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असे आश्वासन खा. वडकुते यांनी यावेळी दिले.

या प्रसंगी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. उज्वलाताई तांभाळे, तालुकाध्यक्ष डॉ. अवधुतराव शिंदे, संजय काकडे यांच्यासह समस्त गावकरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी खासदार रामराव वडकुते यांच्याकडे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत मिळावी, अशी मागणी केली. 

भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात असून, लवकरच मदतकार्य सुरू होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गावात सध्या भीतीचे वातावरण असून नागरिक उघड्यावर जीव मुठीत धरून राहत आहेत.

संबंधित सामग्री

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
भूकंपापासून संरक्षणासाठी हिंगोलीत ‘स्टॅबल’ तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग

भूकंपापासून संरक्षणासाठी हिंगोलीत ‘स्टॅबल’ तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग

Hingoli Earthquake Protection: भूकंपाच्या धक्क्यांपासून जुन्या व असुरक्षित इमारतींचे संरक्षण करण्यासाठी सीएसआयआर-केंद्रीय भवन अनुसंधान संस्थान रुडकी यांनी विकसित केलेल्या स्टॅबल तंत्रज्ञानाचा हिंगोली

Sep 24, 2026
गडचिरोलीत पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के; सिरोंच्यात ३.६ तीव्रतेची नोंद

गडचिरोलीत पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के; सिरोंच्यात ३.६ तीव्रतेची नोंद

गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली.

Sep 03, 2026
नाशिक पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; पेठ, सुरगाणा आणि दिंडोरीत सौम्य हादरे

नाशिक पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; पेठ, सुरगाणा आणि दिंडोरीत सौम्य हादरे

नाशिक जिल्ह्यात आज पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

Aug 17, 2026