जनगणना 2027

डिजिटल मोबाईल अँपच्या माध्यमातून होणार  2027 ची जनगणना  

Digital Census 2027: ही जनगणना आता डिजिटल पद्धतीने म्हणजेच मोबाईल अँप  होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी सांगितले.

डिजिटल मोबाईल अँपच्या माध्यमातून होणार  2027 ची जनगणना  

Digital Census 2027

निवासी उप जिल्हाधिकारी  बोधवड; तीन दिवशीय प्रशिक्षणाला सुरुवात

हिंगोली (Digital Census 2027) : मागील 16 वर्षापासून रखडलेल्या 2027 च्या जनगणनेला सुरुवात होईल मात्र त्यासाठीच अधिकाऱ्यांना तीन दिवसाच्या प्रशिक्षणाला सुरुवात गुरुवार पासून झाली ही जनगणना आता (Digital Census 2027) डिजिटल पद्धतीने म्हणजेच मोबाईल अँप  होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी सांगितले. हिंगोली येथील जिल्हा नियोजन सभागृहात गुरुवारी तीन दिवशीय म्हणजेच 26 ते 28 माज दरम्यानच्या या कालावधीत सकाळी 9.30 ते  सायंकाळी 5 यावेळेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

यावेळी गृहमंत्रालया सहायक निर्देशक चे प्रशिक्षक सुनील अतराम, संजय नाईक, जी प्रसाद, नायब तहसीलदार माने, आदींची उपस्थिती होती. यावेळी तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, नगर पालिकेचे मुख्याधिकारी आदींची प्रशिक्षणाला उपस्थिती होती. पुढे प्रस्तावनेत बोलताना बोधवड म्हणाले, 2021 मध्ये जनगणना होणार होती. मात्र कोविड संकट आल्याने पुढे ढकलण्यात आली. आता 16 वर्षानंतर म्हणजेच 26-27 मध्ये पूर्ण केली जाणार आहे.

आता पूर्वीच्या पद्धतीला फाटा देत यात जनगनणेत अमूलाग्र बदल करण्यात आला आहे.  तंत्रज्ञान, माहिती युग असल्याने आपण प्रशासकीय कामकाजात उपक्रम, योजना  राबवता त्याच प्रमाणे आता पोर्टल वर प्रगणाकडून माहिती भरली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात काय जबाबदाऱ्या असतील त्या चार्ज ऑफिसर, ऑपरेटर, यांनी येणाऱ्या काळात पूर्ण करतील असे निवासी उप जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026