हिंगोली (Hingoli Practitioner Death) : शहरातील व्यवसायीक कांचन प्रभाकर गुंडेवार यांच्या स्कुटीला एका भरधाव वाहनाने २७ मार्चला रात्री ८.३० च्या सुमारास धडक दिली होती. प्रारंभी त्यांना हिंगोली जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने नांदेड येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले होते. या ठिकाणी त्यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. त्यानंतरही प्रकृती चिंताजनक झाली असताना ३० मार्च रोजी दुपारी १२.५० वाजता त्यांचा मृत्यू झाला.
जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यांच्यावर (Hingoli Practitioner Death) अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, जावाई,नातवंड असा परिवार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संचित गुंडेवार यांचे ते वडील होत.