हिंगोली बँक कर्मचारी

बँकिंग क्षेत्रात ५ दिवसांचा आठवडा तात्काळ लागू करा; हिंगोलीत बँक कर्मचाऱ्यांचे तीव्र निदर्शने

Hingoli Bank Employee: युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) च्या केंद्रीय आवाहनानुसार, १२ ऑगस्ट रोजी बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील प्रमुख शहरांमध्ये धरणे आंदोलने व निदर्शने

बँकिंग क्षेत्रात ५ दिवसांचा आठवडा तात्काळ लागू करा; हिंगोलीत बँक कर्मचाऱ्यांचे तीव्र निदर्शने

Hingoli Bank Employee

हिंगोली (Hingoli Bank Employee) : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) च्या केंद्रीय आवाहनानुसार, १२ ऑगस्ट रोजी बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील प्रमुख शहरांमध्ये धरणे आंदोलने व निदर्शने आयोजित करण्यात आली होती. याच साखळीत हिंगोली येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर जिल्ह्यातील विविध बँकांच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली.

UFBU आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्यात पार पडलेल्या १२ व्या द्विपक्षीय करारात बँकांसाठी '५ दिवसांचा आठवडा' (5-Day Work Week) लागू करण्याबाबत एकमताने समझोता झाला होता. मात्र, या कराराला दीर्घकाळ उलटूनही केंद्र सरकारने अद्याप यावर अंतिम मंजुरी दिलेली नाही.

सरकारच्या या भूमिकेविरुद्ध बँक कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), एल.आय.सी. (LIC) आणि संपूर्ण विमा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा लागू आहे; मग केवळ बँक कर्मचाऱ्यांनाच यापासून वंचित का ठेवले जात आहे, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.

विशेष म्हणजे, ५ दिवसांचा आठवडा लागू केल्यास ग्राहकांच्या सेवांवर किंवा कामकाजावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. कारण यासाठी दररोज कामाची वेळ ४० मिनिटांनी वाढवून देण्यास UFBU ने आधीच मान्यता दिली आहे. तरीही सरकारकडून या रास्त मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

या (Hingoli Bank Employee) आंदोलनात स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह (PDCC) जिल्ह्यातील इतर सर्व बँकांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. "आम्हा कर्मचाऱ्यांचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे", "५ दिवसांचा आठवडा तात्काळ लागू करा", अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सरकारने लवकरात लवकर या कराराची अंमलबजावणी करावी, अन्यथा येणाऱ्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा युनियनच्या प्रतिनिधींनी दिला आहे.

 या (Hingoli Bank Employee) निदर्शनामध्ये बँक ऑफ इंडियाचे संजय सातव, अनिल दहातोंडे, राहुल पारटकर, इरफान सर, संतोष पाईकराव, दिगंबर कदम, अजय राठोड,विजय अग्रवाल, नितीन माने , उर्मिला पडोळे तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया कडून नितीन घुगे, शुभम मुंडे मनोहर पुरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे कर्मचारी ओम काळे श्री मांडगे आणि इतर इतर सहकारी तसेच बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा आणि इतर बँकांची कर्मचारीही  उपस्थित होते.

टैग्स: Hingoli Bank Employee