सेनगाव उष्मघात मृत्यू

वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचा उष्मघाताने मृत्यू

Sengaon heat stroke death: सेनगाव आणि औंढा नागनाथ येथे दोन शेतकऱ्यांना उष्माघातामुळे अकस्मात मृत्यू झाला आहे. संतोष ऊर्फ उकंडी गोपाळा धाबे यांचा मृत्यू आणि शिवाजी पांडूजी कोठुळे

वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचा उष्मघाताने मृत्यू

Sengaon heat stroke death

सेनगाव / औंढा नागनाथ (Sengaon heat stroke death) : सेनगाव पोलिस ठाण्याच्या हानकदरी परिसरात एका व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना रविवारी २४ मे रोजी समोर आली आहे. संतोष ऊर्फ उकंडी गोपाळा धाबे (४८) रा. हानकदरी ता. सेनगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष धाबे हे मयत अवस्थेत आढळून आल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच सेनगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, पीएसआय रविकिरण ओफे, हेड कॉन्स्टेबल जीवन मस्के, पोलीस कॉन्स्टेबल सुनील जैस्वाल आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड व फिंगरप्रिंट पथकानेही घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान, नातेवाईकांच्या उपस्थितीत मृतदेह साखरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदना साठी पाठविण्यात आला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार संतोष धाबे यांचा (Sengaon heat stroke death) मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

भोसी येथे शेतकर्‍याचा उष्मघाताने मृत्यू 

औंढा नागनाथ : तालुक्यातील भोसी येथील शेतकरी शिवाजी पांडूजी कोठुळे (५५) यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात २४ मे रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. २३ मे रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास भोसी शिवारातील पाझर येथील शेतात पळसाच्या झाडाखाली शिवाजी कोठुळे यांचा मृतदेह आढळून आला होता. २१ ते २३ मे दरम्यान अतिउन्हाचा त्रास सहन न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले, शेख खुद्दूस, जमादार रविकांत हरकळ, शाहिद सय्यद, किशोर पारिसकर, माधव सूर्यवंशी, अमोल चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. (Sengaon heat stroke death) मृतदेह औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.  शवविच्छेदन अहवालात उष्माघात हेच मृत्यूचे कारण असल्याचे निष्पन्न झाले. अंकुश शिवाजी कोठुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २४ मे रोजी सायंकाळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रविकांत हरकळ करत आहेत.

संबंधित सामग्री

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026
धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026