औराद शहाजानीत उष्माघाताचा बळी;  शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृत्यू

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाची तीव्रता सातत्याने वाढत असून तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या पुढे गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

औराद शहाजानीत उष्माघाताचा बळी;  शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृत्यू

Heat Stroke

औराद शहाजानी (Heat Stroke) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाची तीव्रता सातत्याने वाढत असून तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या पुढे गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या प्रचंड उकाड्याचा फटका सोमवारी एका शेतकऱ्याला बसला असून शेतात काम करत असताना उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. लक्ष्मण दादाराव भंडारे (वय 60) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

औराद शहाजानी परिसरात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचा कहर वाढत चालला आहे. दिवसाचे कमाल तापमान 42.8 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून किमान तापमानही 31.5 अंशांवर गेल्याने रात्रंदिवस नागरिक हैराण झाले आहेत. सततच्या उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत असून शेतकरी, मजूर आणि बाहेर काम करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.

सोमवारी दुपारनंतर सुमारे चार वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण भंडारे हे आपल्या शेतात नेहमीप्रमाणे काम करत होते. यावेळी उन्हाचा तडाखा तीव्र असल्याने अचानक त्यांना चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले. कुटुंबीय व ग्रामस्थांनी तातडीने त्यांना औराद शहाजानी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी निलंगा येथे हलविण्याचा सल्ला दिला. दरम्यान, निलंग्याकडे नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

मयत लक्ष्मण भंडारे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत डॉ. मल्लिकार्जुन शंकद यांनी सांगितले की, संबंधित शेतकरी दिवसभर उन्हात शेतीची कामे करत होते. उष्णतेची तीव्रता जास्त असल्याने शरीरातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली. त्यामुळे तीव्र हृदयविकाराचा झटका आला असावा. प्राथमिक पाहता हा उष्माघातामुळे झालेला मृत्यू असल्याचे दिसून येते.

दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे, डोक्यावर संरक्षण ठेवावे तसेच शेतकरी व मजुरांनी उन्हात दीर्घकाळ काम टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली जिल्हाभरात २० दिवसात दुष्काळीने घेतला ७ शेतकर्‍यांचा मृत्यू

हिंगोली जिल्हाभरात २० दिवसात दुष्काळीने घेतला ७ शेतकर्‍यांचा मृत्यू

Hingoli farmer death: जिल्ह्यात दुष्काळी  परिस्थिती निर्माण झाल्याने हतबल  झालेल्या ७ शेतकर्‍यांनी अवघ्या  २० दिवसात आत्महत्या करून जीवनयात्रा  संपविण्याची घटना घडली  आहे.

Sep 27, 2026
ईसापूर रमणा येथे शेतकऱ्याची आत्महत्या

ईसापूर रमणा येथे शेतकऱ्याची आत्महत्या

हिंगोलीच्या ईसापूर रमणा येथे ५० वर्षीय शेतकरी विठ्ठल वाढवे यांची आत्महत्या; नापिकी, दुष्काळ, कर्ज आणि मुलीच्या विवाहाची चिंता असल्याची माहिती.

Sep 26, 2026
सुपर एल निनोचा जगाला मोठा धोका; ४.५१ लाख अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज, भारतात १५,८०० मृत्यूंची शक्यता

सुपर एल निनोचा जगाला मोठा धोका; ४.५१ लाख अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज, भारतात १५,८०० मृत्यूंची शक्यता

सुपर एल निनोमुळे जगभरात ४.५१ लाख अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज असून भारतात १५,८०० मृत्यूंची शक्यता. महाराष्ट्रातही १००% दुष्काळाचा इशारा.

Sep 24, 2026
लातूरमध्ये दुष्काळी परिस्थितीची पाहणी; उपाययोजनांना सुरुवात, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याची फडणवीसांची ग्वाही

लातूरमध्ये दुष्काळी परिस्थितीची पाहणी; उपाययोजनांना सुरुवात, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याची फडणवीसांची ग्वाही

लातूरमध्ये दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना मुख्यमंत्री फडणवीसांनी उपाययोजनांना सुरुवात झाल्याचे सांगितले. मराठवाडा वॉटर ग्रीडचा डीपीआर डिसेंबरपर्यंत अपेक्षित.

Sep 23, 2026
रोहित्रावर काम करताना विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू

रोहित्रावर काम करताना विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू

Transformer Accident Farmer Death: तालुक्यातील पाडी पोहकर येथे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी रोहित्रावर काम करण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा विजेच्या धक्क्याने होरपळून मृत्यू झाल्याची घटना रविवारी

Sep 20, 2026