हयात प्रमाणपत्र ऑनलाईन

हयात प्रमाणपत्र ऑनलाईन अद्यावत करणे बंधनकारक

Hayat Certificate Online: महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना ऑनलाईन हयात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

हयात प्रमाणपत्र ऑनलाईन अद्यावत करणे बंधनकारक

Hayat Certificate Online

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना तहसिलदारांचे आवाहन

चिखली (Hayat Certificate Online) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 7 मे 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार, विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना आता Beneficiary Satyapan App द्वारे हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या *Hayat Certificate Online( निर्णयानुसार लाभार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे किंवा नातेवाईकांच्या मदतीने हयात प्रमाणपत्र अद्यावत करावे. तसेच गावातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), ग्राम महसूल सेवक (कोतवाल), ग्रामपंचायत संगणक परिचालक, सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. हयात प्रमाणपत्र काढण्यासाठी लाभार्थ्यांनी मोबाईलवरील गुगल प्लेस्टोअरमधून Beneficiary Satyapan App आणि Aadhar Face RD हे ॲप डाउनलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक नमूद करून नोंदणी करावी लागेल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित योजनेची निवड करून फेस कॅप्चर किंवा बोटांचे ठसे या पर्यायाद्वारे डिजिटल हयात प्रमाणपत्र तयार करता येणार आहे.

चिखली तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी तातडीने हयात प्रमाणपत्र ऑनलाईन अद्यावत करून घ्यावे, असे आवाहन तहसिलदार विजय सवडे यांनी केले आहे. यासंदर्भात (Hayat Certificate Online) काही अडचण किंवा शंका असल्यास संबंधित गावातील तलाठी, कोतवाल अथवा तहसिल कार्यालय, चिखली येथील संगायो शाखेशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार हयात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांचे जून महिन्यापासून अनुदान बंद करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांनी याची गंभीर दखल घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026