हळद चाळ तंत्र

हळद साठवणीसाठी ‘हळद चाळ’ तंत्र विकसित करणार

Turmeric Sifting Technique: परिषदेचे मुख्यकर्तव्याधिकारी विवेक गायकवाड या ‘हळद चाळ’ तंत्र विकसित करण्यावर काम करीत आहेत. हळदीच्या किमतीच्या उतार-उतारावर नियंत्रण

हळद साठवणीसाठी ‘हळद चाळ’ तंत्र विकसित करणार

Turmeric Sifting Technique

 

किंमतीच्या चढ - उतारावर उपाय काढण्यासाठी जि.प. सीईओ गायकवाड यांचे प्रयत्न

हिंगोली (Turmeric Sifting Technique) : हळदीच्या भावात सातत्याने होणारी चढ उतार शेतकर्‍यांसाठी नेहमीच मारक ठरते. यावर उपाय म्हणुन ‘हळद चाळ’ तंत्र विकसित करण्याची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी हरिद्राच्या संशोधकांना दिली आहे. 

या बाबत देशोन्नतीशी बोलतांना मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांनी सांगितले की, राज्यात कांद्याच्या साठवणीसाठी ‘कांदाचाळ’ तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्याच धरतीवर ‘हळद चाळ’ यंत्रणा तयार करण्याबाबत तातडीने संशोधन करावे अशी सूचना ‘हरिद्रा’ च्या संशोधकांना दिल्याचे त्यांनी सांगितले. या सोबतच  हळद उकळण्यासाठी प्रत्येक उत्पादक आप आपल्या पध्दतीने प्रयोग करीत असतो. त्या ऐवजी एक तंत्रशुध्द पध्दत यासाठी विकसित करण्याची सूचनाही संशोधकांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

हळद कापणीसाठी २५ हजारात तयार होणारे उपकरण जिल्ह्यातील बचत गटांच्या मार्फत हळद उकळण्याची व्यवस्था जिल्हाभर करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.  यामुळे हळद उत्पादकांचा वेळ, पैसा व श्रम बचत होईल, तसेच बचत गटांचे उत्पन्नही वाढेल असे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दै. देशोन्नतीशी बोलतांना सांगितले.