हंडरगुळी खून प्रकरण

पाच वर्षांनंतर हंडरगुळी खूनप्रकरणाचा निकाल; आरोपीला जन्मठेप

Handarguli murder case: धारदार शस्त्राने केलेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी पंकज तुकाराम भोसले (रा. हंडरगुळी) यास उदगीर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा

पाच वर्षांनंतर हंडरगुळी खूनप्रकरणाचा निकाल; आरोपीला जन्मठेप

Handarguli murder case

 

वाढवणा पोलिसांच्या तपासाला न्यायालयीन यश; उदगीर अतिरिक्त सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

हंडरगुळी (Handarguli murder case) : येथे धारदार शस्त्राने केलेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी पंकज तुकाराम भोसले (रा. हंडरगुळी) यास उदगीर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा आणि २० हजार रुपये दंड सुनावला. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एल. पी. पाच्छे यांनी २२ सप्टेंबर २०२६ रोजी हा निकाल दिला.
या प्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४/२०२०, कलम ३०२ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या (Handarguli murder case) प्रकरणाचा सत्र खटला क्रमांक ११/२०२२ असा होता.

चिंचा झाडण्यासाठी गेलेल्या अजमोद्दीन यांच्यावर हल्ला
२ एप्रिल २०२० रोजी हंडरगुळी परिसरातील शेतात अजमोद्दीन शेख हे चिंचा झाडण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या अजमोद्दीन शेख यांना प्रथम हंडरगुळी येथील शासकीय रुग्णालयात आणि त्यानंतर उदगीर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या (Handarguli murder case) प्रकरणी मृत अजमोद्दीन यांचे पुत्र इस्माईल अजमोद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पूर्वीच्या जागेच्या वादातून झालेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर हा खून झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.या गुन्ह्याचा तपास सपोनि बाळासाहेब नरवटे यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आणि केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी पंकज भोसले यास कलम ३०२ भादंविनुसार दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या प्रकरणात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एस. एम. गिरवलकर यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. तर पैरवी अंमलदार एएसआय व्ही. डी. कलवले यांनी न्यायालयीन कामकाजासाठी प्रभावी समन्वय साधला. वाढवणा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयीन पैरवी व समन्वयाची कार्यवाही करण्यात आली. गंभीर गुन्ह्यांमध्ये पुरावे संकलन, तपासाची गुणवत्ता आणि प्रभावी न्यायालयीन पैरवी यामुळे आरोपीला शिक्षा होण्यास मदत झाल्याचे पोलिसांनी नमूद केले.

टैग्स: Handarguli murder case