गुम्मी ग्रामपंचायत कार्यालय

गुम्मी ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ एकवटले

Gummi Gram Panchayat: गुम्मी ग्रामपंचायत कार्यालयात 25 ऑगस्ट रोजी सरपंच सौ. दिपाली नंदकिशोर हुडीवाले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचा आवश्यक कोरम पूर्ण

गुम्मी ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ एकवटले

Gummi Gram Panchayat

 

सचिव बदलविण्याचा ठराव एमताने मंजूर; वरिष्ठ स्तरावरुन कारवाई नाही

बुलढाणा (Gummi Gram Panchayat) : गुम्मी ग्रामपंचायत कार्यालयात 25 ऑगस्ट रोजी सरपंच सौ. दिपाली नंदकिशोर हुडीवाले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचा आवश्यक कोरम पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. या सभेत गावातील प्रलंबित समस्या आणि ग्रामसेवकांच्या अकार्यक्षम पद्धतीवरून ग्रामस्थांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतल्याने ग्रामसेवक बदलविण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

एप्रिल २०२५ मध्ये दीपक सुभाष पवार यांनी गुम्मी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकपदाचा पदभार स्वीकारला. पदभार घेतल्यापासून त्यांनी गावातील नागरी सुविधा आणि विकासाच्या एकाही कामाकडे लक्ष दिले नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. एखादा नागरिक किंवा सदस्य कामानिमित्त गेला असता, त्यांना सनदशीर उत्तरे देण्याऐवजी ग्रामसेवक उद्धटपणे आणि उडवाउडवीची उत्तरे देतात, तसेच 'तुम्हाला काय करायचे ते करा' अशी अरेरावीची भाषा वापरतात, असा संताप नागरिकांनी सभेत व्यक्त केला. ग्रामसेवकांच्या या बेजबाबदार रवैयामुळे गावात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत धूर व औषध फवारणी न केल्यामुळे गावात डेंग्यू, टायफॉईड आणि कावीळ यांसारख्या साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

चौकशीची व बदलीची मागणी..
ग्रामसेवकांच्या अशा कारभारामुळे गावचे आरोग्य आणि विकास धोक्यात आल्याने, सद्यस्थितीत कार्यरत असलेले ग्रामसेवक दीपक पवार यांची तातडीने येथून बदली करण्यात यावी, असा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः गावात येऊन या सर्व प्रकाराची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी प्रशासनाकडे या ठरावाद्वारे केली आहे.