हदुष्काळग्रस्त शेतकर्यांना ठोस मदत जाहीर करण्याची मागणी
सेनगाव (Drought Damage GR) : राज्य सरकारने दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या जीआरमध्ये शेतकर्यांना ठोस आर्थिक मदतीची तरतूद नसल्याचा आरोप करीत शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने जीआरची प्रत जाळून २८ सप्टेंबर सोमवार रोजी निषेध करण्यात आला.
जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध करण्यात आला. शासनाच्या निर्णयात प्रामुख्याने सर्वेक्षण व पंचनाम्यांवर भर देण्यात आला असून, प्रत्यक्ष मदतीबाबत स्पष्टता नसल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी असल्याचे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी यावेळी सांगितले.दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
त्यामुळे केवळ पंचनामे न करता नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने ठोस आर्थिक मदत, पीकनुकसान भरपाई तसेच शेतकरी व शेतमजुरांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात तालुकाप्रमुख संतोष देवकर, शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख, तालुका संघटक प्रवीण महाजन, माजी नगरसेवक मंगेश पवार, दिगंबर देशमुख, अमजद पठाण, धनंजय देशमुख, कैलास देशमुख, विलास सुतार, प्रवीण जाधव, सचिन जाधव, पंढरी गव्हाणे, सुदाम वाघमारे, माधव गाडे, शिवा शिंदे यांच्यासह शिवसैनिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.