पशुधन वाचविण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख यांचे नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन
चिखली (Government Fodder Camp) : बुलढाणा जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी शासकीय चारा छावण्या तातडीने सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख यांच्या नेतृत्वात 24 सप्टेंबर 2026 रोजी चिखली तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात कमी पावसामुळे चारा व पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.
शेतातील पिके पावसाअभावी वाळून गेल्याने जनावरांना चारा उपलब्ध होत नाही. परिणामी (Government Fodder Camp) शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा विकत घ्यावा लागत असून, काही ठिकाणी जनावरे कवडीमोल भावात बाजारात विकण्याची वेळ आली आहे. या गंभीर परिस्थितीची शासनाने तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि बुलढाणा जिल्ह्यात शासकीय चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख यांच्या नेतृत्वात चिखली शिवसैनिकांनी केली आहे.
निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. यावेळी निवेदन देतांना उपजिल्हाप्रमुख शिवाजीबापू देशमुख,महिला जिल्हाप्रमुख मायाताई मस्के, गजानन मोरे चिखली तालुकाप्रमुख, कपिल खेडेकर, उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी कल्पनाताई बोधेकर,शिवाजी शिराळे, उपशहर प्रमुख अमर काळे, छोटू कांबळे, शहर संघटक पांडा अण्णा जेठे, अभी वीर, विशाल इंगळे, योगेश गवई ,महेश बोधेकर, निलेश रक्ताडे, सचिन चोरघडे ,सागर झगरे आदी शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.