पातूर (Gorakshan Sanstha Missing Girls) : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आलेगाव येथील गोरक्षण संस्थेतून २५ सप्टेंबर रोजी बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय मुलीचा पोलिसांनी यशस्वी शोध घेतला आहे. चान्नी पोलीस, अकोला स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणार पोलिसांच्या संयुक्त पथकाने रात्रभर शोधमोहीम राबवून मुलीला लोणार परिसरातील घरकुल जवळील पट्टी परिसरातून सुरक्षित ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून आणखी सहा जणांच्या भूमिकेची तपासणी सुरू आहे.
उपस्थित पदाधिकारी:
या (Gorakshan Sanstha Missing Girls) प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी चान्नी पोलीस ठाण्यात धडक देऊन मुलीचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली होती व आंदोलनाचा इशारा दिला होता. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, सहसचिव मीनाताई इंगळे, माजी उपसभापती इम्रान खान, अर्चना डाबेराव, तालुकाध्यक्ष डॉ. ओमप्रकाश धर्माळ, युवक आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत तायडे, दिनेश गवई, राणा डाबेराव, मंगेश लोखंडे, संजय पाचपोर, अशोक अंभोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिक्रिया:
"प्रशासनाने तत्परतेने मुलीचा शोध लावला व आरोपींना अटक केली. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सुपुर्द करावा, जेणेकरून अन्य धागेदोरे हाती लागतील."
-रितेश फुलारी, वंचित बहुजन आघाडी
गोरक्षण संस्था बेपत्ता मुली
गोरक्षण संस्थेतून बेपत्ता मुलीचा शोध यशस्वी; तिघे पोलिसांच्या ताब्यात
Gorakshan Sanstha Missing Girls: पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आलेगाव येथील गोरक्षण संस्थेतून २५ सप्टेंबर रोजी बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय मुलीचा पोलिसांनी यशस्वी शोध घेतला आहे.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Gorakshan Sanstha Missing Girls