वेकोलिची माती वाहतुक ठप्प; शेकडो ग्रामस्थां चे ठिय्या आंदोलन, आमरण उपोषणाने संघर्ष तिव्र
कन्हान (Gondegaon Overbridge Protest) : ओव्हरब्रिज खालुन दुचाकीने जात असले ल्या सुशीला पाटील व कल्पना इरपाते यांच्या दुचाकी जवळ अचानक मोठे दगड कोसळल्याने दोघी महिला थोडक्यात बचावल्या असुन किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. याचवेळी वेकोलिच्या एका वाहना वरही दगड पडुन काच फुटल्याचा दावा करण्यात आला असुन जुने गोंडेगाव येथे वेकोलिच्या माती डम्पिं ग व वाहतुकी विरोधात ग्रामस्थांचा संताप उफाळुन आला आहे. (Gondegaon Overbridge Protest) जुन्या गोंडेगाव मार्गावरील ओव्हरब्रिज वरून माती वाहुन नेणाऱ्या अवजड वाहनातुन मोठे दगड खाली पडल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थांनी माती वाहतुकीचा मार्ग रोखुन ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे गोंडेगावकडे जाणारे मातीने भरलेले टिप्पर जागेवरच थांबले असुन वाहतुक ठप्प झाली आहे.
वादानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
आंदोलना दरम्यान वेकोलिच्या सुरक्षा कर्म चाऱ्यांशी ग्रामस्थांची बाचाबाची झाल्याने परिस्थिती चिघळल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यासोबत मारहाण झाल्याची तसेच पोलिसांसोबत धक्काबुक्की झाल्या ची माहिती समोर आली आहे. मात्र या घटनांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी वृत्त लिहेपर्यंत स्पष्ट झालेली नव्हती. घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ शशांक गौडा व पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांनी पोलीस पथ कासह घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त व दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले.
सुरक्षा भिंत नसल्याने नागरिकांच्या जीवाला धोका
ओव्हरब्रिजच्या दोन्ही बाजुंना पुरेशी सुरक्षा व्यवस्था व सुरक्षा भिंत नसल्याने अवजड वाहनांमधूुन खाली पडणारी माती व दगड थेट नागरिकांच्या अंगा वर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र बुधे यांनी घटनास्थळी पाहणी करून वेकोलि प्रशासनाने तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोज ना कराव्यात, अशी मागणी केली.

१६७ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
माती वाहतुकीच्या विरोधासोबतच जुने गोंडे गाव येथील गेल्या अनेक वर्षांपासुन प्रलंबित पुनर्वस नाचा प्रश्नही आंदोलनाचा प्रमुख मुद्दा ठरला आहे. ग्राम स्थांच्या म्हणण्यानुसार, पुनर्वसनाचा प्रश्न दोन दशकां हुन अधिक काळापासुन प्रलंबित आहे. काही कुटुंबांचे पुनर्वसन झाले असले तरी अनेक कुटुंबांना अद्याप योग्य मोबदला व पुनर्वसनाची प्रतिक्षा आहे. ग्रामस्थां च्या दाव्यानुसार १६७ कुटुंबांचे पुनर्वसन अद्याप प्रलं बित आहे. पुनर्वसनासाठी भूखंड उपलब्ध करून देणे, सध्याच्या परिस्थितीनुसार वाढीव मोबदला देणे आणि संपुर्ण प्रश्नाचा कायमस्वरूपी तोडगा काढणे, या प्रमुख मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.
सरपंच मनीषा दलाल यांनी घेतला ग्रामस्थांशी संवाद
गोंडेगाव ग्राम पंचायत च्या सरपंचा मनिषा दलाल यांनी आंदोलन स्थळी पोहोचुन ग्रामस्थांशी चर्चा केली. जुने गोंडेगाव पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षां पासून प्रलंबित असुन गेल्या चार वर्षां पासुन आपण प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठ पुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. ३० सप्टेंबर रोजी दगड कोसळण्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती व संताप निर्माण झाला आहे. दगड एखाद्या व्यक्तीच्या अंगावर पडुन जीवितहानी झाली असती तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्लॉट व वाढीव मोबदल्याची मागणी
ज्येष्ठ समाजसेवक अशोक दलाल यांनी सांगि तले की, दगड पडल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थ एकत्र आले असुन गावाचे तातडीने पुनर्वसन, पुनर्वसनग्रस्त कुटुंबांना भूखंड आणि सध्याच्या परिस्थितीनुसार वाढीव मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांसंदर्भात रामटेकचे एचडीओ प्रियेश महाजन यांना निवेदन देण्यात आले. संबंधित अधिका ऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रश्नावर चर्चा करण्याचे आश्वा सन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
एचडीओ प्रियेश महाजन आंदोलनस्थळी; वेकोलि अधिकारी अनुपस्थित
गुरुवारी (दि. १) ऑक्टोबर ला रामटेकचे एचडीओ प्रियेश महाजन आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांचे पुनर्वसनासह विविध प्रश्न समजुन घेतले. ग्रामस्थांनी उपस्थित केलेले बहुतांश प्रश्न वेको लिशी संबंधित असुन वेकोलि अधिकाऱ्यां सोबत तातडीने बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महाजन यांनी सांगितले. मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार बैठकीसाठी अपेक्षित वेकोलि संबंधित अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थां मध्ये नाराजी आणखी वाढली. केवळ आश्वासन नको, तर लेखी व ठोस निर्णय हवा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
ठिय्या आंदोलनानंतर आमरण उपोषणाचा निर्णय
बुधवारी सायंकाळी दगड कोसळण्याच्या घटनेनंतर सुरू झालेले आंदोलन गुरुवारी अधिक तीव्र झाले. प्रशासनाशी चर्चा होऊनही तात्काळ तोडगा निघाला नसल्याने आंदोलनस्थळी मंडप उभारून आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. दरम्यान गोंडेगाव खुली खदान ची माती वाहुन नेणारे वेकोलिचे टिप्पर बुधवारी सायंकाळपासुन उभे असल्याचे सांगण्यात येत असुन माती डम्पिंग व वाहतु कीचे काम प्रभावित झाले आहे.
जनप्रतिनिधींच्या अनुपस्थितीवरही नाराजी
आंदोलना दरम्यान प्रमुख जनप्रतिनिधी उप स्थित न राहिल्याबद्दल काही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या सुरक्षेसह वर्षानुवर्षे प्रलंबित अस लेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधावा, अशी मागणी करण्यात आली.
“कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत माती वाहतुक होऊ देणार नाही”
ग्राम पंचायत सदस्य साहिल गजभिये यांनी सांगितले की, ओव्हरब्रिजवरून उत्खननाची माती वाहु न नेली जात असुन त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. अनेकदा संबंधित अधिका ऱ्यांच्या निदर्शनास समस्या आणुनही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. “नागरिकांची सुरक्षा आणि पुनर्वसनाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत माती वाहतुक होऊ देणार नाही,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
आता वेकोलि प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
गोंडेगावमध्ये ओव्हरब्रिजवरून दगड कोसळल्या च्या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचवेळी १६७ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्नही आंदोलनाच्या केंद्रस्थानी आला आहे. सुरक्षित वाहतुक व्यवस्था, ओव्हरब्रिजची सुरक्षा आणि पुनर्वस नाचा ठोस निर्णय, या मागण्यांवर आता वेकोलि प्रशा सन व जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे गोंडे गाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. वृत्त लिहेपर्यंत गोंडे गावमधील माती वाहतुक बंद असुन ग्रामस्थ आंदोलना वर ठाम होते.