घरकुल भीक मागो आंदोलन

घरकुलासाठी ‘भीक मागो आंदोलन’; पंचायत समितीसमोर वंचितचा आक्रोश

Gharkul Bhik Mago Andolan: रमाई, शबरी व प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रलंबित घरकुल प्रकरणांना मंजुरी देऊन रखडलेले हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावेत, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी

घरकुलासाठी ‘भीक मागो आंदोलन’; पंचायत समितीसमोर वंचितचा आक्रोश

Gharkul Bhik Mago Andolan

 

गट विकास अधिकारी चे आश्वासनानंतर आंदोलन मागे 

कळमनुरी (Gharkul Bhik Mago Andolan) : रमाई, शबरी व प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रलंबित घरकुल प्रकरणांना मंजुरी देऊन रखडलेले हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावेत, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कळमनुरी पंचायत समिती कार्यालयासमोर ‘भीक मागो आंदोलन’ करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी यांनी आश्वासन दिल्यानंतर भीक  आंदोलन मागे घेण्यात आला.

तालुक्यात रमाई आवास योजनेतील १,५६० आणि शबरी आवास योजनेतील ७६५, अशी एकूण २,३२५ प्रकरणे प्रलंबित असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी सर्वेक्षण, जिओ टॅगिंग व इतर प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात, तसेच मंजूर घरकुलांचे रखडलेले हप्ते जमा करावेत, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी प्रशासनाच्या विलंबाच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी रस्त्यावर प्रातिनिधिक स्वरूपात भीक मागून शासनाचे लक्ष वेधले. यावेळी गटविकास अधिकारी यांनी घरकुलाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
 
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राजू कांबळे, मोहम्मद असलम, जयभीम डोंगरे, जितेश कदम, संतोष इंगोले, सचिन हटकर, समाधान पाईकराव, गोविंद गवळी, गजानन पवार, कपिल नरवाडे, रविराज पंडित, बुद्धभूषण पंडित, रोहन परघने, सुमित इंगोले आदी सहभागी झाले.