गणपती विसर्जन रस्ता रोको

डिगोळ येथे गणपती विसर्जनाच्या वेळी रस्ता रोको; १४ जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा

Ganapati Visarjan Rasta Roko: डिगोळ (ता. शिरूर अनंतपाळ) गणपती विसर्जनाच्या वेळी पोलिसांच्या सूचनांचे पालन न करता रस्ता रोको केल्याप्रकरणी १४ जणांसह इतरांविरुद्ध शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

डिगोळ येथे गणपती विसर्जनाच्या वेळी रस्ता रोको; १४ जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा

Ganapati Visarjan Rasta Roko

निलंगा (Ganapati Visarjan Rasta Roko) : डिगोळ (ता. शिरूर अनंतपाळ) येथे गणपती विसर्जनाच्या वेळी पोलिसांच्या सूचनांचे पालन न करता रस्ता रोको केल्याप्रकरणी १४ जणांसह इतरांविरुद्ध शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १०.३५ ते ११.५० वाजण्याच्या दरम्यान लातूर-उदगीर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वरील डिगोळ येथे ही घटना घडली. शंभू महादेव गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह संबंधित व्यक्तींनी निर्धारित वेळेत गणपती विसर्जन न करता महामार्गावर एकत्र येऊन रस्ता रोको केल्याचा आरोप आहे.

यावेळी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास नकार देऊन पोलिस कर्मचारी, होमगार्ड व महिला होमगार्ड यांच्यासोबत वाद घातल्याचे, धक्काबुक्की तसेच शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच शासकीय कर्तव्य बजावत असताना पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई विनय वशिष्ठ उबाळे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा क्रमांक २९२/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्यात माधव भाउसाहेब बिरादार, रामेश्वर विनोद डिगोळे, मंगेश मारोती दासरे, सुदर्शन दिनकर डिगोळे, गोविंद मधुकर दासरे, संदीप मारोती टाकळगावे, किरण रविंद्र बिरादार, नवाज बाबुराव मुजेवार, शुभम नानासाहेब बिरादार, सुधाकर शिंगरुपे, बाळू महादू लोंढे, सतीश राजाराम कलमे, सचिन माधव वडजे, अमोल ज्ञानोबा शेळके यांच्यासह इतर व्यक्तींचा समावेश आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रायबोळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; येरोळ मोडवर मृतदेह ठेवून संतप्त मराठा बांधवांचा रास्ता रोको

मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; येरोळ मोडवर मृतदेह ठेवून संतप्त मराठा बांधवांचा रास्ता रोको

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाण येथील सुनील बिरादार यांच्या आत्महत्येनंतर संतप्त मराठा समाजबांधवांनी येरोळ मोड येथे रास्ता रोको आंदोलन केले. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.

Sep 09, 2026
दिव्यांगांचा ५ टक्के निधी तातडीने वाटप करा; अन्यथा २७ ऑगस्टला रास्ता रोको

दिव्यांगांचा ५ टक्के निधी तातडीने वाटप करा; अन्यथा २७ ऑगस्टला रास्ता रोको

Divyangg Rasta Roko: सेनगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनी शासन निर्णयानुसार दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी तातडीने वितरित करावा, तसेच त्यांना शासनाच्या नियमानुसार आवश्यक सोयी-सुविधा

Aug 19, 2026
लामजना येथे 24 ऑगस्टला शेतकरी संघटनांचे रास्ता रोको

लामजना येथे 24 ऑगस्टला शेतकरी संघटनांचे रास्ता रोको

Farmers Rasta Roko: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची बोळवण करत वाऱ्यावर सोडण्याचे कुटील कारस्थान सरकारचे असल्याने शेतकऱ्यांत प्रचंड असंतोष आहे.

Aug 18, 2026
पालकमंत्र्यांनी उपोषणार्थींकडे पाठ फिरवल्याने रास्ता रोको आंदोलन

पालकमंत्र्यांनी उपोषणार्थींकडे पाठ फिरवल्याने रास्ता रोको आंदोलन

Rasta Roko Movement: ध्वजारोहणानंतर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी उपोषणकर्त्यांकडे पाठ फिरवित काढता पाय घेतल्यामुळे संतप्त झालेल्या उपोषणकर्त्यांनी आज पालकमंत्र्यांचा निषेध नोंदविला.

Aug 17, 2026
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन; आमदार रामदास मसराम यांचे नेतृत्व 

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन; आमदार रामदास मसराम यांचे नेतृत्व 

NEET Paper Leak: नीट पेपर फुटी प्रकरणी लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेस कमिटी, आरमोरी विधानसभा क्षेत्र वतीने आमदार रामदासजी मसराम यांच्या नेतृत्वात  रेल्वे बोगद्यानजीक पॉईंट वर भव्य रास्ता रोको आंदोलन

Jul 24, 2026