गडचिरोली-विकासपल्ली बस

गडचिरोली-विकासपल्ली बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी

Gadchiroli-Vikaspally Bus: गडचिरोलीचे लोक बस सेवा सोयीनाही काटत असल्याने गडचिरोलीच्या भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांनी आगार प्रमुखांना तात्काळ बससेवा पुनरुज्जीवित करण्याचे निवेदन

गडचिरोली-विकासपल्ली बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी

Gadchiroli-Vikaspally Bus

 

भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांचे आगार प्रमुखांना निवेदन

घोट (Gadchiroli-Vikaspally Bus) : गडचिरोली ते विकासपल्ली या बससेवेची तात्काळ पुनर्सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांनी गडचिरोली आगार प्रमुख  यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

गडचिरोली ते विकासपल्ली ही बससेवा अनेक वर्षांपासून सुरू होती. विशेषतः दुपारच्या वेळेत चामोर्शी, घोट, रेगडी मार्गे विकासपल्लीपर्यंत धावणारी ही एकमेव बस असल्याने परिसरातील नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी व प्रवाशांना मोठा दिलासा मिळत होता. मात्र ही बस सेवा बंद झाल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबत सुरेश शहा यांनी आगार प्रमुख नेवारे यांची भेट घेऊन बससेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. यावेळी आगार प्रमुखांनी नागरिकांची अडचण लक्षात घेऊन ही बस सेवा लवकरच सुरू करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले.