गडचिरोली-उमरखेड मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात

भरधाव वेगातील बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गडचिरोली-उमरखेड मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात

Gadchiroli Accident

दोघांचा मृत्यू; अनेक जखमी, एका वर्षाच्या चिमुकल्याची प्रकृती गंभीर

गडचिरोली (Gadchiroli Accident) : गडचिरोली आगाराची एसटी महामंडळाची बस क्रमांक MH 14 - 0741 ही सकाळी 7.15 वाजता गडचिरोलीवरून उमरखेडकडे रवाना झाली होती. मात्र शहराबाहेर पडताच नवेगाव-मुरखळा गावांनजीक बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या भीषण दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका वर्षाच्या चिमुकल्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. बसमध्ये सुमारे 50 प्रवासी प्रवास करत होते.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढले आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. नरोटे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली. तसेच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना जखमींवर तातडीने आणि सर्वतोपरी उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, आमदार डॉ. नरोटे रुग्णालयात पोहोचले असता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे उपस्थित होत्या. अपघातातील गंभीर जखमींवर उपचार सुरू आहे. भीषण अपघातामुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026