Forest Guard

आंबोलीत २२ वर्षीय महिला वनरक्षकाचा मृत्यू; भाड्याच्या खोलीत आढळल्या आश्लेषा मांगले

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली परिसरात २२ वर्षीय महिला वनकर्मचाऱ्याच्या मृत्यूची घटना समोर आली आहे.

आंबोलीत २२ वर्षीय महिला वनरक्षकाचा मृत्यू; भाड्याच्या खोलीत आढळल्या आश्लेषा मांगले

केसरी वनरक्षक म्हणून होत्या कार्यरत; माडखोल धवडकी येथील घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली परिसरात २२ वर्षीय महिला वनकर्मचाऱ्याच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. आंबोली वन परिमंडळातील केसरी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या आश्लेषा सागर मांगले यांचा माडखोल धवडकी येथील भाड्याच्या घरात मृत्यू झाला. आश्लेषा मांगले या मूळच्या आजरा, कोल्हापूर येथील रहिवासी होत्या.

रविवारी सुट्टी असल्याने आश्लेषा दिवसभर आपल्या खोलीतच होत्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या घराबाहेर न आल्याने घरमालक पूजा गोवेकर यांना संशय आला. त्यांनी दरवाजा ठोठावून प्रतिसाद मिळवण्याचा प्रयत्न केला. आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा उघडून पाहिल्यानंतर आश्लेषा मृतावस्थेत आढळल्या.

ही घटना रविवारी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. आश्लेषा मांगले यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आश्लेषा सागर मांगले या सुमारे तीन वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग वन विभागाच्या सेवेत रुजू झाल्या होत्या. त्यांच्याकडे आंबोली वन परिक्षेत्रातील केसरी वनरक्षक पदाची जबाबदारी होती. माडखोल धवडकी येथे त्या पूजा गोवेकर यांच्या घरात भाड्याने राहत होत्या.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक आणि पोलीस महेश जाधव यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. वनविभागाच्या देवसू येथील अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले.

याप्रकरणी घरमालक पूजा गोवेकर यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक करत आहेत.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026