परभणीतील गौतम मुंढे यांच्या घरावर पिस्तुलातून फायरिंग;विलास बनसोडे यांना अटक

अध्यक्ष गौतम मुंढे यांच्या सुजाता नगर येथील घरावर जयंती मिरवणुकीच्या वादाच्या रागातून बुधवार १५ एप्रिल रोजी दोघांनी हल्ला करून एकाने स्वतःच्या पिस्तूल मधून पाच फायरिंग केल्याची घटना घडली.

परभणीतील गौतम मुंढे यांच्या घरावर पिस्तुलातून फायरिंग;विलास बनसोडे यांना अटक

Firing Incident

जयंती मिरवणुकीत झाला होता वाद

परभणी (Firing Incident) : पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष गौतम मुंढे यांच्या सुजाता नगर येथील घरावर जयंती मिरवणुकीच्या वादाच्या रागातून बुधवार १५ एप्रिल रोजी दुपारी २:३० वाजता दोघांनी हल्ला करून एकाने स्वतःच्या पिस्तूल मधून पाच फायरिंग केल्याची घटना घडली. फायरिंग करणारा विलास बनसोडे यास पोलिसांनी अटक केली असून नानलपेठ पोलीस ठाण्याकडून पुढील तपास चालू आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात परभणी जिल्ह्यात साजरी करण्यात आली. शहरामध्ये देखील जयंतीला कुठेही गालबोट लागली नाही. परंतु सुजाता नगर पेडगाव रोड येथून निघालेल्या जयंती मिरवणुकी दरम्यान जयंती पुढे घेण्याच्या कारणावरून गौतम मुंढे व विलास बनसोडे यांच्या किरकोळ वाद झाला. या वादा नंतर मिरवणूक शांततेत पार पडली. मात्र झालेला वाद लक्षात ठेवून बनसोडे यांनी गौतम मुंढे  यांच्या मुलाला कॉल करून तुझ्या बापाचे पाय तोडतो, कुठे आहे तुझा बाप अशी धमकी दिली. त्यानंतर बनसोडे यांनी गौतम मुंढे यांच्या घरी येऊन आपल्या स्वतःच्या रिव्हॉलवर मधुन पाच फेर्‍या गोळया झाडल्या. पिस्तुलातून निघालेल्या गोळ्या भिंतीला व घराच्या काचांवर लागून काचा फुटल्या. घरातील कुठल्याही सदस्याला हानी झाली नाही परंतु कुटुंबातील सदस्य प्रचंड दहशतीखाली ओरडत होते.

या घटनेची माहिती पोलिसांना कळतात पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील व त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली तसेच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी देखील तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी ऑडिट नगर मधील विलास रतन बनसोडे यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. या घटनेमुळे सुजाता नगरासह संपूर्ण परभणी शहरात दहशतीचे वातावरण पसरले. नानलपेठ ठाण्यात बनसोडे व आणखी एक जणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे संपूर्ण मुंढे कुटुंब नानलपेठ पोलीस ठाण्यात बसून असून त्यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण आहे.

आरोपीवर कठोर कारवाई व्हावी - गौतम मुंढे 

विलास बनसोडे हा परिसरात गुंडागर्दी करतो. जयंती मिरवणूक दरम्यान किरकोळ वाद झाल्यानंतर मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु त्याने मनात राग धरून घरावर हल्ला केला. अशा गुंडावर कठोर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे अशी प्रतिक्रिया गौतम मुंढे यांनी देशोन्नती शी बोलताना दिली

संबंधित सामग्री

 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर; ‘I am a good fool’ वाक्याने चर्चेला उधाण

लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर; ‘I am a good fool’ वाक्याने चर्चेला उधाण

लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर आले. ‘I am a good fool’ या वाक्यामुळे चर्चेला उधाण आले असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

Sep 16, 2026
छत्रपती संभाजीनगर मध्ये लग्नाचा तगादा अन् धमक्यांनी घेतला जीव? तरुणीच्या आत्महत्येनंतर संशयिताला अटक

छत्रपती संभाजीनगर मध्ये लग्नाचा तगादा अन् धमक्यांनी घेतला जीव? तरुणीच्या आत्महत्येनंतर संशयिताला अटक

लग्नासाठी वारंवार फोन करून दबाव आणि धमक्या दिल्याच्या आरोपानंतर गोंदेगावातील १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. सोयगाव पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर १० तासांत करण वाघला अटक केली.

Sep 12, 2026
मुंबई पोलिसांचा ₹6.41 कोटींचा पेरोल घोटाळा; मुख्य सूत्रधार अजय राठोड दहिसरमधून अटक

मुंबई पोलिसांचा ₹6.41 कोटींचा पेरोल घोटाळा; मुख्य सूत्रधार अजय राठोड दहिसरमधून अटक

मुंबई पोलिसांच्या उत्तर प्रादेशिक विभागातील ₹6.41 कोटींच्या पेरोल घोटाळ्यात मुख्य लिपिक अजय राठोडला गुन्हे शाखेने दहिसरमधून अटक केली. न्यायालयाने त्याला १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.

Sep 09, 2026
नागपुरात डान्स क्लासच्या वादातून पत्नीचा मृत्यू; मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक

नागपुरात डान्स क्लासच्या वादातून पत्नीचा मृत्यू; मारहाण केल्याप्रकरणी पतीला अटक

नागपुरात कौटुंबिक वादाचे रूपांतर हिंसक घटनेत होऊन 38 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Sep 05, 2026