राजस्थानातून आलेल्या बोगस जिप्समचा मसोडमध्ये पर्दाफाश; कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळल

खरीप हंगाम तोंडावर असतानाच बोगस खत विक्रीचे रॅकेट उघडकीस आणत कृषी विभागाने शनिवारी कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे मोठी कारवाई केली.

राजस्थानातून आलेल्या बोगस जिप्समचा मसोडमध्ये पर्दाफाश; कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळल

Fake Fertilizer

कळमनुरी (Fake Fertilizer) : खरीप हंगाम तोंडावर असतानाच बोगस खत विक्रीचे रॅकेट उघडकीस आणत कृषी विभागाने शनिवारी कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे मोठी कारवाई केली. राजस्थानमधून आलेल्या एका ट्रकमध्ये सुमारे दीड लाख रुपये किमतीचे ६९० जिप्सम खताचे पोते जप्त करण्यात आले.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी बोगस निविष्ठा विक्री रोखण्यासाठी दिलेल्या सक्त सूचनांनंतर कृषी विभाग अ‍ॅक्शन मोडवर आला होता. पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनीही तातडीने पोलीस मदत देण्याचे आदेश दिले होते.

शनिवारी दुपारी मसोड येथे ट्रकमधून थेट शेतकऱ्यांना जिप्समची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती कृषी विकास अधिकारी अतुल वायसे यांना मिळाली. त्यांनी कृषी अधिकारी पंकज राठोड यांच्या पथकासह तत्काळ घटनास्थळ गाठले. ट्रकची तपासणी केली असता आत जिप्समचा मोठा साठा आढळून आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी ट्रकसह सर्व ६९० पोती जप्त करून कळमनुरी पोलीस ठाण्यात जमा केली आहेत.

जिप्सम हे अधिकृत खत नसून त्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली जाते. वेळीच झालेल्या या कारवाईमुळे शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान टळले आहे.

या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून जिल्ह्यात बोगस खते व बियाणे विक्री करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026