Fake Appointment Letter

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र; शिपाई भरतीच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

जिल्हा परिषद शाळांमधील परिचर (शिपाई) पदभरतीची बनावट जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता त्यापेक्षाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र; शिपाई भरतीच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

Fake Appointment Letter

गडचिरोली (Fake Appointment Letter) : जिल्हा परिषद शाळांमधील परिचर (शिपाई) पदभरतीची बनावट जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता त्यापेक्षाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीला थेट जिल्हा परिषदेच्या नावाने शिपाई पदाचे बनावट नियुक्तीपत्रच देण्यात आल्याचे उघड झाले असून, या प्रकारामुळे जिल्हा परिषदेसह प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी दिली.

बनावट भरती जाहिरातीनंतर थेट बनावट नियुक्तीपत्राचा धक्का

यापूर्वी समाज माध्यमावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर पदासाठी २२ हजार रुपये मासिक वेतनावर भरती होणार असल्याची बनावट जाहिरात प्रसारित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ खुलासा करून ही जाहिरात पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट केले होते. कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नसल्याचे सांगत नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले होते.

मात्र, या प्रकरणाची गंभीरता कमी होत नाही तोच आता एका उमेदवाराला जिल्हा परिषद, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि निवड समितीच्या नावाने कंत्राटी शिपाई पदाचे बनावट नियुक्तीपत्र देण्यात आल्याचे समोर आले आहे. या बनावट आदेशात मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांच्या सह्या, शिक्के, नियुक्तीच्या अटी व शर्ती तसेच कार्यालयीन पत्राचा संपूर्ण नमुना हुबेहूब वापरण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर संबंधित उमेदवाराला विशिष्ट तारखेला कामावर रुजू होण्याचे निर्देशही या आदेशात देण्यात आले आहेत.

बनावट आदेश देणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार

या प्रकारामुळे केवळ बेरोजगार युवकांची फसवणूक होत नसून शासकीय यंत्रणेच्या विश्वासार्हतेलाही तडा जात असल्याची भावना प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी या नियुक्तीपत्राची सत्यता नाकारत हा आदेश पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट केले असून संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

गडचिरोलीत बनावट कागदपत्रांचे वाढते जाळे

दरम्यान, गडचिरोलीत गेल्या काही दिवसांत बनावट कागदपत्रांचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने खनिज निधीच्या प्रशासकीय मान्यतेचे (प्रमा) आदेश तयार केल्याचे प्रकरण राज्यभर गाजत आहे. त्याआधी गडचिरोलीच्या धान घोटाळ्याशी संबंधित बनावट पत्र काँग्रेसचे नेते तथा आमदार नाना पटोले यांच्या बनावट स्वाक्षरीचे मंत्रालयात सादर करण्यात आल्याची घटनाही समोर आली होती.

आता त्यात बनावट भरती जाहिरात आणि थेट बनावट नियुक्ती आदेशाची भर पडल्याने गडचिरोलीत बनावट कागदपत्रांचे जाळे किती खोलवर पोहोचले आहे, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सतत उघडकीस येणाऱ्या अशा घटनांमुळे केवळ प्रशासनालाच नव्हे तर पोलिस यंत्रणेसमोरही बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेऊन त्यांना आळा घालण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026