इंजनगाव जागा वाद

इंजनगाव येथे वादग्रस्त जागेवरून पुन्हा तणाव!

Engangaon Land Dispute: वसमत तालुक्यातील इंजनगाव (पश्चिम) येथील समाज मंदिराच्या जागेवरून पुन्हा एकदा वाद उद्भवला होता अगोदर झेंडा लावण्याचा कारणावरून वाद झाला होता शनिवारी पुतळा

इंजनगाव येथे वादग्रस्त जागेवरून पुन्हा तणाव!

Engangaon Land Dispute

 

पोलीस व महसूल प्रशासनाने संयमी भूमिका घेतल्याने तणाव निवळला

वसमत (Engangaon Land Dispute) : वसमत तालुक्यातील इंजनगाव (पश्चिम) येथील समाज मंदिराच्या जागेवरून पुन्हा एकदा वाद उद्भवला होता अगोदर झेंडा लावण्याचा कारणावरून वाद झाला होता शनिवारी पुतळा बसवण्याचा प्रकार घडला होता. मात्र  पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी अत्यंत संयमाची भूमिका घेतली दोन्ही बाजूच्या नागरिकांचे बैठक घेऊन यातून योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने अखेर तणाव निवळला आहे इंजन गावच्या प्रश्नावर 19 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय  येथे दोन्ही समाजाशी समन्वय बैठक होणार असल्याचे तहसीलदार सारंग चव्हाण यांनी सांगितले.
 
वसमत तालुक्यातील इंजनगाव पश्चिम येथील समाज मंदिराचा वाद जुना आहे दोन समाजात या जागेवरून नेहमी वाद उद्भवतो साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने या जागेवर झेंडा लावण्याचा प्रकार झाल्याने वाद उद्भवला होता त्यावेळी तहसीलदार सारंग चव्हाण व पोलीस प्रशासनाने प्रकरण कुशलतेने हाताळले व वाद निवळला होता. मात्र
शनिवारी पुन्हा या जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याचा प्रकार समोर पुन्हा दोन समाजात तेढ निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय अधिकारी विकास माने तहसीलदार सारंग चव्हाण पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे  यांच्यासह पोलीस व महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही समाजाच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची व नागरिकांची एकत्र बैठक घेतली परिस्थिती समजावून सांगितली व हा वाद कायमचा मिटवण्यासाठी प्रशासन गांभीर्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही समाजाने संयमाची व सामंजस्याची भूमिका घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी केले.

तहसीलदार सारंग चव्हाण यांनी दोन्ही समाजापुढे प्रस्तावना करून यातून योग्य तो तोडगा निघेल दोन्ही समाजाला तो मान्य होईल असा तोडगा काढल्या जाईल असा विश्वास दाखवला त्यातून दोन्ही समाजाने  सामंजस्याची भूमिका घेतली व वादावर पडदा पडण्यास मदत झाली. तात्पुरत्या स्वरूपात बसवलेला पुतळा सन्मानाने बाजूच्या सभागृहात हलवण्यात आला आहे.
पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने अत्यंत संयमी व समय सूचक भूमिका घेतली व वादग्रस्त होऊ पाहणाऱ्या प्रकरणावर पडदा पडला आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात 19 ऑगस्ट रोजी दोन्ही समाजातील प्रमुख नेते कार्यकर्ते पदाधिकारी व महसूल पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित राहतील त्यांच्या उपस्थितीत योग्य तोडगा काढल्या जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

इंजन गावात तातडीने हजर झाले अधिकारी

इंजनगाव (Engangaon Land Dispute) पश्चिम येथे वादग्रस्त जागेवर पुन्हा वाद उद्भवला असल्याचे माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा,वसमतचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे,वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे, तहसीलदार सारंग चव्हाण, यांच्यासह महसूल व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी दाखल झाले. मोठा पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला होता. काही वेळ तणावाचे वातावरण होते. मात्र परिस्थिती लगेच नियंत्रणात आली व तणाव निवळला आहे. 

19 ऑगस्ट रोजी बैठक
यासंदर्भात तहसीलदार सारंग चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी इंजन गाव पश्चिम येथे काही वेळ वाद उद्भवला होता. मात्र दोन्ही समाजाने अत्यंत संयमाची भूमिका दाखवली महसूल व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही समाजाशी चर्चा केली त्यातून मार्ग निघाला आहे. आता 19 ऑगस्ट रोजी हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात तोडगा काढण्यासाठी व्यापक बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला समाजातील सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील त्यात शंभर टक्के तोडगा निघेल, असा विश्वास तहसीलदार सारंग चव्हाण यांनी देशोन्नतीशी बोलताना व्यक्त केला आहे. 

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026