अतिक्रमण हटवून शहरातील फूटपाथ मोकळे करा

: शहरात अनेक ठिकाणी आणि बहुतांश रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे.

अतिक्रमण हटवून शहरातील फूटपाथ मोकळे करा

Encroachment Drive

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर (Encroachment Drive) : शहरात अनेक ठिकाणी आणि बहुतांश रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. फूटपाथवर दुकाने थाटलेली आहेत. पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा नाही. या सर्वांवर तातडीने कारवाई करून नागपूरला अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करा आणि कारवाईचा अहवाल आठ दिवसांत सादर करा, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज रविवारी महापालिका व सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांना दिले.

शहरातील विविध विकासकामे व प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आयोजित बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे, राज्यसभा सदस्य माया इवनाते, आमदार कृष्णा खोपडे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेते बाल्या बोरकर, महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, माजी आमदार डॉ. मिलिंद माने आदींची उपस्थिती होती.

'नागपूर शहरातील अतिक्रमित जागांचे सर्वेक्षण करा. या जागांची लीज कुणाकडे आहे, या जागा कुणाच्या ताब्यात आहेत, त्यांचे आरक्षण कोणते आहे, याची माहिती घ्या. महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासला हे काम करायचे आहे. पण महापालिका आणि प्रन्यासच्या सर्वेक्षणाची सत्यता पडताळण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वतंत्र सर्वेक्षणदेखील करून घ्या,' असेही निर्देश ना. गडकरी यांनी महापालिका आयुक्तांना दिले. या सर्वेक्षणानंतर कोणत्या जागा खेळाच्या मैदानांसाठी किंवा उद्यानांसाठी आरक्षित आहेत, याची माहिती मिळेल. त्यानुसार मैदाने व उद्याने विकसित करण्यात यावी, असेही ना. गडकरी म्हणाले.

समिती स्थापन करून जागा निश्चित करा

शहरातील पाणी पुरवठा, सर्वांसाठी घरे, शहरात खेळासाठी २०० मैदाने व उद्याने विकसित करणे, शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी बांगलादेश पॅटर्न राबविणे, नागनदी व पोहरा नदी प्रदूषणमुक्त अभियानांतर्गत सुरू भुयारी गडर लाईनची निर्मिती करणे, शहरात चोवीस तास पाणी पुरवठा करण्याच्या योजनेची अंमलबजावणी, केंद्र सरकारच्या मदतीने सुरू असलेल्या अमृत १ व अमृत टप्पा २ अंतर्गत सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, जुना भंडारा रस्त्याचे रुंदीकरण, मौजा चिंचभुवन भागात ३० मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी जागेचे भूसंपादन व सिमेंट रस्त्याची सद्यस्थिती, दलित वस्तीमध्ये सुरू असलेल्या विकास कामाबाबतही यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी माहिती जाणून घेतली. यासंदर्भात महापालिकेच्या स्तरावर एक समिती स्थापन करून या जागा निश्चित करावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

नागपूर शहरात महापालिका व प्रन्यासच्या मालकीच्या असलेल्या खुल्या जागेची माहिती यावेळी देण्यात आली. या जागेचा उपयोग भाजी व मटन मार्केट विकसित करण्यासंदर्भात सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

फूड मॉल व हॉकर्स झोन निर्माण करण्यावर भर द्या

महापालिका, सुधार प्रन्यास, नझुलच्या जागांचा एकत्रित विचार करण्यात यावा, अनेकदा रस्त्यांवर बाजार भरत असल्याने नागरिकांना त्रास होतो. तसेच वाहतूक विस्कळीत होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे ते म्हणाले. या जागांवर फूड मॉल व हॉकर्स झोन निर्माण करण्यासंदर्भात त्यांनी निर्देश दिले. ना. गडकरी म्हणाले, 'जे ले-आऊट्स महापालिकेला हस्तांतरित करण्यात आले आहेत किंवा प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यांच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी पुन्हा सुधार प्रन्यासकडे जाण्याची गरज पडणार नाही, अशी व्यवस्था करा,' असेही त्यांनी सुचविले.

 

संबंधित सामग्री

१००% इथेनॉलवर धावणार टोयोटाची इनोव्हा; ऑक्टोबरमध्ये लॉन्च, गडकरींचा मोठा दावा

१००% इथेनॉलवर धावणार टोयोटाची इनोव्हा; ऑक्टोबरमध्ये लॉन्च, गडकरींचा मोठा दावा

ऑक्टोबरमध्ये १००% इथेनॉलवर चालणारी टोयोटा इनोव्हा लॉन्च होणार असल्याची गडकरींची घोषणा. पेट्रोलची गरज नाही, खर्च ₹२५ प्रतिलिटरइतका असल्याचा दावा.

Sep 27, 2026
नागपूर शहरातील सर्वात लांब आणि महागडा उड्डाणपूल; ९९८ कोटींच्या इंदोरा–दिघोरी एलिव्हेटेड कॉरिडॉरचे आज लोकार्पण

नागपूर शहरातील सर्वात लांब आणि महागडा उड्डाणपूल; ९९८ कोटींच्या इंदोरा–दिघोरी एलिव्हेटेड कॉरिडॉरचे आज लोकार्पण

नागपूरचा ८.९ किमीचा इंदोरा-दिघोरी उड्डाणपूल आज खुला होत आहे. ९९८ कोटींच्या या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा.

Sep 19, 2026
चिखलीच्या विकासाला हिरवाईची जोड!

चिखलीच्या विकासाला हिरवाईची जोड!

चिखलीत जयस्तंभ चौक ते खामगाव चौफुली मार्गावर सुरू असलेल्या वृक्षलागवडीची नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी पाहणी करून वृक्षसंवर्धनाच्या सूचना दिल्या.

Sep 17, 2026
हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीच्या ग्रामीण पोलीस स्टेशन रोडवर नागरिकांच्या अंगावर धावणाऱ्या पिसाळलेल्या गायीला नगरपरिषदेच्या पथकाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर ताब्यात घेतले.

Sep 13, 2026
FASTag वापरणाऱ्यांसाठी मोठी सुविधा; आता एका बँकेतून दुसऱ्या बँकेत करता येणार पोर्ट

FASTag वापरणाऱ्यांसाठी मोठी सुविधा; आता एका बँकेतून दुसऱ्या बँकेत करता येणार पोर्ट

FASTagधारकांसाठी केंद्र सरकारने मोठी सुविधा सुरू केली आहे. ‘वन टॅग’ फ्रेमवर्कअंतर्गत आता FASTag एका बँकेतून दुसऱ्या सहभागी बँकेत पोर्ट करता येणार आहे.

Sep 12, 2026