रोजगार सेवक कामबंद आंदोलन

रोजगार सेवकांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन: पातूर तालुक्यात गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

Rojgar kambandh Andolan: महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून पातूर तालुक्यातील रोजगार

रोजगार सेवकांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन: पातूर तालुक्यात गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

Rojgar kambandh Andolan

पातूर (Rojgar kambandh Andolan) : महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून पातूर तालुक्यातील रोजगार सेवकांनीदेखील सक्रिय सहभाग नोंदवत बुधवारी (१ ऑक्टोबर) पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

२२ सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी
संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, २२ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा आणि ३ ऑक्टोबर २०२४ चा शासन निर्णय पुन्हा लागू करण्यात यावा, ही प्रमुख मागणी लावून धरण्यात आली आहे. याशिवाय रोजगार सेवकांच्या इतर प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन त्यांची पूर्तता करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहण्याचा इशारा
शासनाने मागण्यांची योग्य ती दखल घेऊन पूर्तता करेपर्यंत हे काम बंद आंदोलन असेच सुरू ठेवले जाईल, असा ठाम इशारा संघटनेच्या प्रतिनिधींनी दिला आहे. (Rojgar kambandh Andolan) रोजगार सेवक हे ग्रामपातळीवर मनरेगा (MGNREGA) व रोजगाराशी संबंधित इतर सर्व कामांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे या संपामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यावेळी पातूर तालुक्यातील रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने रोजगार सेवकांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून यावर तातडीने तोडगा काढावा, अशी अपेक्षा सर्व उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

टैग्स: Rojgar kambandh Andolan