मीटर वीजचोरी

मीटरमध्ये छेडछाड करून तब्बल ८ लाख .२५ हजारांची वीजचोरी!

Electricity theft Case:

मीटरमध्ये छेडछाड करून तब्बल ८ लाख .२५ हजारांची वीजचोरी!

Electricity theft Case

 

चिलका येथील ग्राहकावर महावितरणच्या फिरत्या पथकाची कारवाई;
पाच महिन्यांत ३१ हजार ६४४ युनिट वीज चोरी 

उदगीर (Electricity theft Case) : मीटरमध्ये अनधिकृतपणे छेडछाड करून तब्बल ८ लाख २५ हजार १४० रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी अहमदपूर तालुक्यातील चिलका येथील एका ग्राहकाविरुद्ध उदगीर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अझर अजगर सय्यद (रा. गट नं. ६२, चिलका, ता. अहमदपूर) याच्याविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम २००३ मधील कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

महावितरणच्या लातूर येथील फिरत्या पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता तुकाराम गोरोबा वडवळे यांनी याबाबत फिर्याद दिली आसून यांच्या फिर्यादीनूसार उदगीर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मीटरमध्ये अनधिकृतपणे छेडछाड करून वीज वापरल्याचे तपासणीत आढळून आले.
या (Electricity theft Case) प्रकारामुळे संबंधित ग्राहकाने तब्बल पाच महिन्यांच्या कालावधीत ३१ हजार ६४४ युनिट विजेचा अनधिकृत वापर केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या वीजचोरीमुळे महावितरणचे ८ लाख २५ हजार १४० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप आहे.

या (Electricity theft Case) प्रकरणी ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.२४ वाजता उदगीर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार हारणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनूर यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याच्या या प्रकारामुळे महावितरणच्या तपासणी मोहिमेत मोठ्या प्रमाणात वीजचोरी उघडकीस येत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

टैग्स: Electricity theft Case