वीज ग्राहक संघटना

सणासुदीतही वीज गायब, स्मार्ट मीटरची सक्ती; वीज ग्राहक संघटना आक्रमक

Electricity Consumers' Association: सणासुदीच्या दिवसांमध्ये वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, ग्राहकांच्या संमतीशिवाय सक्तीने बसवण्यात येणारे स्मार्ट मीटर आणि ग्रामीण भागातील कोलमडलेली वीज व्यवस्था

सणासुदीतही वीज गायब, स्मार्ट मीटरची सक्ती; वीज ग्राहक संघटना आक्रमक

Electricity Consumers' Association

 

२२ सप्टेंबरला  अधीक्षक अभियंत्यांना जाब विचारला जाणार

हिंगोली (Electricity Consumers' Association) : सणासुदीच्या दिवसांमध्ये वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, ग्राहकांच्या संमतीशिवाय सक्तीने बसवण्यात येणारे स्मार्ट मीटर आणि ग्रामीण भागातील कोलमडलेली वीज व्यवस्था यामुळे त्रस्त झालेल्या वीज ग्राहक संघटनेने आता थेट महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मंगळवार २२ सप्टेंबर रोजी दुपारी ठीक तीन वाजता संघटनेच्या वतीने अधीक्षक अभियंता यांची भेट घेण्यात येणार आहे. ही भेट मोर्चाच्या स्वरूपाची नसून, ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारींवर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेली बैठक आहे.

मध्यंतरीच्या काळात अनेक ग्राहकांनी ग्रुपवर आणि संघटनेच्या सदस्यांकडे वीज पुरवठा खंडित होणे, ग्रामीण भागातील वीज यंत्रणेची दुरवस्था आणि लाईन कर्मचार्‍यांच्या कामकाजातील दिरंगाईबाबत तक्रारी मांडल्या होत्या. मात्र अद्यापही त्यावर कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्याने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. विशेषतः सणाचे दिवस असतानाही तासनतास वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

त्याचबरोबर ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.ज्या ग्राहकांच्या तक्रारींचे अद्याप समाधान झालेले नाही, अशा सर्व ग्राहकांनी आपली वीज बिले आणि लेखी तक्रारीसह या बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन वीज ग्राहक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
 

संबंधित सामग्री

वीज ग्राहक संघटनेच्या कार्यालयाचे हिंगोलीत उद्घाटन; ११ ऑगस्टला महावितरणवर भव्य मोर्चा

वीज ग्राहक संघटनेच्या कार्यालयाचे हिंगोलीत उद्घाटन; ११ ऑगस्टला महावितरणवर भव्य मोर्चा

Electricity Consumers' Association: विजेच्या विविध प्रश्नांवरून ग्राहकांमध्ये वाढत असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहक संघटनेची चळवळ आता अधिक तीव्र होत असून, याच अनुषंगाने आज हिंगोली

Aug 02, 2026
स्मार्ट मीटर सक्ती थांबवा, जुनेच मीटर ठेवा; अन्यथा 11 ऑगस्टला कार्यालयावर मोर्चा

स्मार्ट मीटर सक्ती थांबवा, जुनेच मीटर ठेवा; अन्यथा 11 ऑगस्टला कार्यालयावर मोर्चा

कार्यरत व अचूक असलेले वीज मीटर बेकायदेशीरपणे बदलू नयेत, स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी.

Jul 30, 2026