शेतातील आखाड्यावर वयोवृद्धाचा मृतदेह आढळला

शिवरातील देवदरी शिवार परिसरातील स्वतःच्या शेताच्या आखाड्यावर शहरातील बंडू अप्पा पंचलिंगे या वयोवृद्धाचा १७ मे रोजी मृतदेह आढळून आला.

शेतातील आखाड्यावर वयोवृद्धाचा मृतदेह आढळला

Dead Body Found

कळमनुरी (Dead Body Found) : शिवरातील देवदरी शिवार परिसरातील स्वतःच्या शेताच्या आखाड्यावर शहरातील बंडू अप्पा पंचलिंगे या वयोवृद्धाचा १७ मे रोजी मृतदेह आढळून आला.

याबाबत माहिती अशी की, शहरातील तांबोळी गल्ली येथील रहिवासी बंडू अप्पा पंचलिंगे (वय ६५) हे देवदरी शिवारात असलेल्या आपल्या शेतात राहत असत. १७ मे रोजी सकाळी त्यांचा मुलगा शेतात पोहोचला असता, आखाड्यावर आपल्या वडिलांचा मृतदेह आढळून आला.

त्यांनी तत्काळ कळमनुरी पोलिसांना खबर दिली. सपोनि रघुनाथ शेवाळे, पो. उपनि. संतोष इंगळे, सतीश ठेंगे, पोलीस कर्मचारी कानबाराव हराळ, शकुराव बेले, अरविंद राठोड हे घटनास्थळी पोहोचले. तसेच पोलिस अधीक्षक निलाभ रोहन व पोलीस उप अधीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांनीही घटनास्थळी भेट दिली.

मृतदेह शवविच्छेदनासाठी कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास कळमनुरी पोलीस करत आहेत. सदर मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली असून संबंधित वृद्धाचा मृत्यू आकस्मिक की घातपात, याबाबत चर्चा सुरू आहे.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Sep 30, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
सचिन वाझेला मोठा दिलासा; अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन

सचिन वाझेला मोठा दिलासा; अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन

अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला विशेष NIA कोर्टाने जामीन मंजूर केला. सविस्तर आदेश अद्याप समोर आलेला नाही.

Sep 29, 2026