जनसंघर्ष अर्बन निधी शाखेतील साहित्य पोलिसांनी घेतले ताब्यात !

वादग्रस्त जनसंघर्ष अर्बन निधी शाखेतील साहित्य न्यायालयाच्या आदेशानुसार पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे  उपनिरीक्षक राजेश लाखकर यांनी दि. २८ मार्च रोजी ताब्यात घेऊन गेले आहे.

जनसंघर्ष अर्बन निधी शाखेतील साहित्य पोलिसांनी घेतले ताब्यात !

Court Action

न्यायालयाचा आदेश

मानोरा (Court Action) : शहरात अनेक दिवसापासून बंद असलेल्या अवस्थेत असलेल्या वादग्रस्त जनसंघर्ष अर्बन निधी शाखेतील साहित्य न्यायालयाच्या आदेशानुसार पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे  उपनिरीक्षक राजेश लाखकर यांनी दि. २८ मार्च रोजी ताब्यात घेऊन गेले आहे.

मानोरा शहरात प्रणित मोरे यांनी खातेदार ग्राहकांना ज्यादा व्याजासह विविध प्रलोभने दाखवून एजंटाच्या माध्यमातून १ कोटी ५३ लाख रुपयांच्या ठेवी जमा केल्या होत्या. मात्र अचानक मानोरा येथील जनसंघर्ष अर्बन शाखा बंद पडल्याने शाखेमध्ये पैसे जमा केलेल्या खातेदारांची झोप उडाली होती. त्यावेळी दिग्रस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्याने यवतमाळ येथील गुन्हे शाखेच्या पथकाने २७ डिसेंबर रोजी रात्री बँकेची शाखा सील केली होती. जनसंघर्ष अर्बन निधी शाखेत घोटाळा केल्याप्रकरणी मुख्य सुत्रधार प्रणित मोरे यांच्यासह त्यांचे साथीदार आरोपी कारागृहात बंद आहेत. अद्यापही जनसंघर्ष अर्बन निधी शाखेत ठेवी जमा केलेले ग्राहक आपल्या जमापुंजी मिळविण्यासाठी न्यायालयीन लढा लढत आहेत. शनिवारी (दि. २८ मार्च रोजी) उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा चे रायटर रवी शिहे, महेश नाईक व दिग्रस पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक राजेश लाखकर यांनी मानोरा येथील जनसंघर्ष अर्बन निधी शाखे मधील संपूर्ण सामान् फर्निचर, लॅपटॉप, पि सी ओ  न्यायालयाच्या आदेशानुसार ताब्यात घेऊन गेले आहे. यावेळी शाखेचे मॅनेजर कृष्णा रणखांब, कर्मचारी गौतम बरडे, अजिंक्य इंगोले, प्रतीक काडदाते, पिग्मी एजंट गिरीश तापडिया, शाखा इमारतीचे मालक स्वप्नील ठाकरे, खातेदार राम राऊत आदी उपस्थित होते. 

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Sep 30, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
सचिन वाझेला मोठा दिलासा; अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन

सचिन वाझेला मोठा दिलासा; अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन

अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला विशेष NIA कोर्टाने जामीन मंजूर केला. सविस्तर आदेश अद्याप समोर आलेला नाही.

Sep 29, 2026