Cotton Development Programme

मलकापुरात 'कापूस विकास कार्यक्रम' अंतर्गत मोफत बियाणे वाटप; आधुनिक शेतीचा स्वीकार करण्याचे आ. चैनसुख संचेती यांचे आवाहन

मलकापूरचे माजी आमदार चैनसुखजी संचेती यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उन्नत आणि दर्जेदार कापूस बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

मलकापुरात 'कापूस विकास कार्यक्रम' अंतर्गत मोफत बियाणे वाटप; आधुनिक शेतीचा स्वीकार करण्याचे आ. चैनसुख संचेती यांचे आवाहन

Cotton Development Programme

केंद्र सरकारच्या 'कापूस क्रांती' उपक्रमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांचे वितरण; उत्पादनवाढीसाठी नव्या तंत्रज्ञानावर भर

मलकापूर (Cotton Development Programme) : कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून त्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभरात राबविण्यात येत असलेल्या 'कापूस विकास कार्यक्रम' (कापूस क्रांती) अंतर्गत मलकापुरात विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मलकापूरचे माजी आमदार चैनसुखजी संचेती यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उन्नत आणि दर्जेदार कापूस बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान बोलताना माजी आमदार चैनसुखजी संचेती यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी कल्याणाशी संबंधित धोरणांचा उल्लेख करत शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, "शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र सरकार सातत्याने विविध योजना आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहे. पारंपरिक शेती पद्धतीसोबत आधुनिक तंत्रांचा अवलंब करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतल्यास कापसाचे अधिक उत्पादन घेणे शक्य होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी या संधींचा प्रभावीपणे उपयोग करून आर्थिक प्रगती साधावी."

या कार्यक्रमाला परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी भाजपचे स्थानिक नेते व पदाधिकारी संजय गावंडे, केदार इकडे, सुभाष चव्हाण, अमित चौबे यांच्यासह अनेक मान्यवर आणि कृषी क्षेत्रातील जाणकार उपस्थित होते.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेतकरी बांधवांनी केंद्र सरकारच्या 'कापूस विकास कार्यक्रम' तसेच माजी आमदार चैनसुखजी संचेती यांच्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त करत आभार मानले.

केंद्र सरकारचा 'कापूस विकास कार्यक्रम' हा जमिनीच्या सुपोषणापासून ते आधुनिक आणि दर्जेदार बियाण्यांच्या उपलब्धतेपर्यंत शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नऊ शेळ्या दगावल्याने कुटुंबावर आर्थिक संकट

अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नऊ शेळ्या दगावल्याने कुटुंबावर आर्थिक संकट

Small Farmers Crisis: तालुक्यातील पिंपळदरी येथील भूधारक शेतकऱ्यांच्या नऊ शेळ्या अचानक एका दहा मिनिटात दगावल्याने मोठी आर्थिक हानी झाली असून सदर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

Oct 04, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026