काँग्रेस शिवराज मोरे

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी शिवराज मोरे यांच्या उमेदवारीची मागणी

Congress Shivraj More: आगामी पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांना काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी शिवराज मोरे यांच्या उमेदवारीची मागणी

Shivraj More

 

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेस नेतृत्वाकडे आग्रह

पुणे (Congress Shivraj More) : आगामी पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांना काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या मतदारसंघातील पदवीधर, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटी व कंत्राटी क्षेत्रातील कर्मचारी तसेच सुशिक्षित बेरोजगारांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवराज मोरे यांनी सातत्याने आंदोलने आणि पाठपुरावा केला असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आला आहे.

पाचही जिल्ह्यांतील पदवीधरांच्या प्रश्नांवर लढा दिल्याचा दावा

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे प्रश्न, भरती प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, विद्यार्थ्यांच्या शुल्कासंबंधीच्या मागण्या तसेच सुशिक्षित बेरोजगारीच्या प्रश्नांवर मोरे (Shivraj More) यांनी आंदोलनांच्या माध्यमातून भूमिका मांडली असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांमध्ये युवक काँग्रेस, एनएसयूआय आणि स्थानिक युवा संघटनांच्या माध्यमातून मोरे (Shivraj More) यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क असल्याचा दावा करण्यात आला आहे. पदवीधर मतदारांशी थेट संपर्क आणि मतदार नोंदणीवर भर देण्याची गरज असल्याचेही समर्थकांनी म्हटले आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागावाटपात काँग्रेसने पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाची जागा आपल्याकडे घ्यावी आणि शिवराज मोरे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

या उमेदवारीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांमध्ये काँग्रेसबाबत सकारात्मक संदेश जाईल, असा दावा मागणी करणाऱ्यांनी केला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय व प्रदेश नेतृत्वाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, शिवराज मोरे (Shivraj More) यांची उमेदवारी अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नसून अंतिम निर्णय काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून घेतला जाणार आहे.

संबंधित सामग्री

डीजेविरोधातील लढा ते निवडणुकीचे मैदान? विद्यानंद बापट यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा

डीजेविरोधातील लढा ते निवडणुकीचे मैदान? विद्यानंद बापट यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा

विद्यानंद बापट पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवणार? असीम सरोदेंच्या पोस्टनंतर चर्चेला वेग; मात्र बापटांची अधिकृत उमेदवारी अद्याप जाहीर नाही.

Sep 24, 2026