चिखली तहसील कार्यालयात ‘समाधान शिबिरांचे’ आयोजन

चिखली तहसील कार्यालयात शेतकरी व नागरिकांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे.<br/>

चिखली तहसील कार्यालयात ‘समाधान शिबिरांचे’ आयोजन

Chikhli Revenue Camp

विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली; नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे तहसीलदार विजय सवडे यांचे आवाहन

चिखली (Chikhli Revenue Camp) : सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवर तत्काळ मार्गी लागावेत तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावा, या उद्देशाने चिखली तहसील कार्यालयाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमधून महसूल, ग्रामविकास, कृषी, आरोग्य, पुरवठा, निवडणूक, आधार सेवा आदी विविध विभागांच्या योजना व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

शिबिरांचे आयोजन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे –
१) दि. ११ मे २०२६ – संत सावता माळी भवन, चिखली (चिखली मंडळ)
२) दि. १४ मे २०२६ – जिल्हा परिषद शाळा, गांगलगाव (कोलारा मंडळ)
३) दि. १५ मे २०२६ – जिल्हा परिषद शाळा, बोरगाव काकडे (एकलारा मंडळ)

या शिबिरामध्ये पंतप्रधान आवास योजना व इतर घरकुल योजनांअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना प्रती घरकुल ५ ब्रास मोफत वाळू मंजुरी, पीएम किसान योजनेसाठी लँड सिडिंग, नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे ई-केवायसी, डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ व फेरफार वाटप, अ‍ॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी तयार करणे, नवीन आधार नोंदणी व अद्ययावत सेवा, विविध दाखले वितरण, मतदान कार्ड व आधार जोडणी, संजय गांधी निराधार योजनेची कार्यवाही, रेशन कार्ड सेवा, जॉबकार्ड, आभा कार्ड, आरोग्य तपासणी व लसीकरण, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, महाडीबीटी अंतर्गत कृषी योजनांचा लाभ आदी सेवा दिल्या जाणार आहेत.

तसेच जन्म-मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, ग्रामविकास विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना, शेततळे, सिंचन साधने, पॉलीहाऊस, फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण यांसारख्या योजनांबाबत मार्गदर्शन व लाभही देण्यात येणार आहेत.

याशिवाय शासनाच्या नव्या निर्णयांबाबतही नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. शेतजमीन अकृषिक (NA) करण्यासाठी स्वतंत्र सनद किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष परवानगीची अट रद्द करण्यात आली असून आता केवळ एकदाच रूपांतरण अधिमूल्य भरावे लागणार आहे. वार्षिक NA करही रद्द करण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत शेतरस्ते बारमाही करण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल व यंत्रसामग्रीची वाहतूक सुलभ होणार आहे. तसेच तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेल्या जुन्या खरेदी-विक्री व्यवहारांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता नियमित करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला असल्याची माहितीही या शिबिरात दिली जाणार आहे.

चिखली तालुक्यातील नागरिकांनी या शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विजय सवडे यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

फडणवीस सरकारचा मोठा प्रशासकीय फेरबदल; ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा संपूर्ण यादी

फडणवीस सरकारचा मोठा प्रशासकीय फेरबदल; ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा संपूर्ण यादी

महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणेत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत.

Sep 03, 2026
धोदानी धबधब्यावर अंघोळीस बंदी घाला; सुरक्षा व्यवस्था वाढवा: फरहान अमीन 

धोदानी धबधब्यावर अंघोळीस बंदी घाला; सुरक्षा व्यवस्था वाढवा: फरहान अमीन 

Patur Dhodani Waterfall: पातूर तालुक्यातील पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आलेल्या धोदानी धबधब्यावर वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ कठोर सुरक्षा उपाययोजना

Aug 17, 2026
उत्कृष्ट तहसीलदार म्हणून अभिजित जगताप यांचा महसूल दिनी गौरव

उत्कृष्ट तहसीलदार म्हणून अभिजित जगताप यांचा महसूल दिनी गौरव

माहूर तालुक्यात महसूल विभागाच्या माध्यमातून नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करून देत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल महसूल दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.

Aug 07, 2026
मालेवाडा येथे स्वतंत्र अपर तहसील कार्यालय तातडीने सुरू करा; संतप्त ग्रामस्थांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

मालेवाडा येथे स्वतंत्र अपर तहसील कार्यालय तातडीने सुरू करा; संतप्त ग्रामस्थांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

मंजुरी मिळूनही कार्यालय सुरू करण्यास होत असलेल्या दिरंगाईबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Jul 09, 2026
21 वर्षांच्या सेवेत 25 वी बदली; IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांनी स्वीकारला FDA आयुक्तपदाचा पदभार

21 वर्षांच्या सेवेत 25 वी बदली; IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांनी स्वीकारला FDA आयुक्तपदाचा पदभार

कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि भ्रष्टाचाराविरोधातील कठोर भूमिकेसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ IAS अधिकारी तुकाराम मुंडे  यांनी आज अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे.

May 25, 2026