मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार आंदोलन 

निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्याच्या मागणीसाठी लातूरमध्ये गांधी जयंतीदिनी धरणे आंदोलन 

CEC Gyanesh Kumar Andolan: मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच देशातील सर्व निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी धरणे आंदोलन

निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्याच्या मागणीसाठी लातूरमध्ये गांधी जयंतीदिनी धरणे आंदोलन 

CEC Gyanesh Kumar Andolan

लातूर (CEC Gyanesh Kumar Andolan) : मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच देशातील सर्व निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी 2 ऑक्टोबर 2026 रोजी गांधी जयंतीदिनी लातूर येथील महात्मा गांधी चौकात सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. 

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील निवडणूक आयुक्त मनमानी कारभार करत आहे. काही दिवसांपूर्वी एक्सप्रेसच्या बातमीनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पूर्णपणे एकाधिकार शाही राबवून आणि करोडो मतदारांची नावे यादीतून वगळली आहेत. एसआयआरच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी विशिष्ट धर्म आणि समुहांची नावे वगळली जात आहेत.

आयोगातील सदस्यांमध्ये एक वाक्यता नाही आणि ज्यामुळे अनेक राज्यातील निवडणुका या सत्ताधाऱ्यांना फायदेशीर झालेल्या आहेत.निडणुक आयुक्तांनी देशद्रोह केला आहे. म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार (CEC Gyanesh Kumar Andolan) यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच देशातील सर्व निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात या प्रमुख मागण्यासाठी 2 ऑक्टोबर 2026 रोजी गांधी जयंतीनिमित्त लातूर येथील महात्मा गांधी चौकात सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे.

तरी या (CEC Gyanesh Kumar Andolan) धरणे आंदोलनात सर्व लोकशाही प्रेमी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाई अँड. उदय गवारे, चंद्रकांत चिकटे, प्रा.सुधीर देशमुख, मोहन माने, बसवंत उबाळे, राजकुमार होळीकर, प्रा. सुधीर अनवले, प्रा. यु. डी. गायकवाड, अँड. रामराजे आत्राम, कॉ. विश्वंभर भोसले, अँड. विजय जाधव, प्रा. प्रवीण कांबळे, तानाजी करपुरे, शेख शफी ,इस्माईल बने, शेख मोहम्मद गौस, मोहन कांबळे, मोहसीन खान, सोहम कवठेकर, महेंद्र कांबळे, चंद्रकांत शिंदे, सुनील धाकडे, अँड. जैनुद्दीन शेख व इतर मान्यवरांनी केले आहे.