हिंगोलीत केमिस्टचा बंद शंभर टक्के यशस्वी; औषध दुकाने पूर्णपणे बंद

ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्सच्या वतीने बुधवार, 20 मे रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी केमिस्ट बंदला हिंगोली जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

हिंगोलीत केमिस्टचा बंद शंभर टक्के यशस्वी; औषध दुकाने पूर्णपणे बंद

Chemist Strike

शासनाच्या धोरणांविरोधात केमिस्ट संघटनांचा निषेध

हिंगोली (Chemist Strike) : ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्सच्या वतीने बुधवार, 20 मे रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी केमिस्ट बंदला हिंगोली जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सर्व औषध विक्री दुकाने दिवसभर पूर्णपणे बंद राहिल्याने बंद यशस्वी ठरला.

20 मे रोजी सकाळपासूनच हिंगोली शहरासह कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ आणि सेनगाव या तालुक्यांच्या ठिकाणी तसेच ग्रामीण भागातील सर्व मेडिकल स्टोअर्सची शटर्स बंद दिसून आली. अत्यावश्यक सेवा असूनही केमिस्ट बांधवांनी एकजूट दाखवत या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जिल्ह्यात एकही किरकोळ औषध दुकान सुरू नव्हते.

या एकदिवसीय बंद निमित्त संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निषेध म्हणून हाताला काळ्या फिती लावल्या होत्या. शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यासाठी ही कृती करण्यात आली.

या बंदचे आयोजन तीन प्रमुख मागण्यांसाठी करण्यात आले होते. ऑनलाइन औषध विक्री पूर्णपणे बंद करावी आणि त्यासंबंधीचा GSR 817 दिनांक 28 ऑगस्ट 2018 चा आदेश मागे घ्यावा, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अव्यवसायिक सवलती बंद कराव्यात तसेच बनावट औषधांपासून देशाला वाचवण्यासाठी कोविड काळातील GSR 220 दिनांक 26 मार्च 2020 चा आदेश मागे घ्यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

दरम्यान, बंद काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमधील औषध वितरण केंद्रे तसेच काही आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, खाजगी वैद्यकीय दुकाने पूर्णतः बंद असल्याने रुग्णांना व नातेवाईकांना औषधांसाठी तारांबळ उडाल्याचे चित्र दिसले.

बंद शांततेत पार पडला असून जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. केमिस्ट संघटनांनी या बंदला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व दुकानदारांचे आभार मानले असून शासनाने मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026