चैत्र नवरात्रौत्सव

महाकाली मंदीर सत्रापुर-कन्हान व्दारे घट विसर्जन करून चैत्र नवरात्रौत्सव थाटात संपन्न

Chaitra Navratri Festival: पुजा अर्चना, भजन, विविध धार्मिक कार्यक्रमास कन्हान नदीच्या पावन पात्रात घट विसर्जन आणि महाप्रसाद वितरण करून चैत्र नवरात्रौत्सव थाटात साजरा करण्यात आला.

महाकाली मंदीर सत्रापुर-कन्हान व्दारे घट विसर्जन करून चैत्र नवरात्रौत्सव थाटात संपन्न

Chaitra Navratri Festival

कन्हान (Chaitra Navratri Festival) : जय महाकाली सेवा समिती सत्रापुर (कन्हान) ता. पारशिवनी, जि. नागपुर व्दारे कन्हान नदीच्या तीरावर वसलेले ऐतिहासिक, प्राचिन महाकाली मंदीर सत्रापुर (कन्हान) येथे घटस्थापना करून नऊ दिवस पुजा अर्चना, भजन, विविध धार्मिक कार्यक्रमास कन्हान नदीच्या पावन पात्रात घट विसर्जन आणि महाप्रसाद वितरण करून (Chaitra Navratri Festival) चैत्र नवरात्रौत्सव थाटात साजरा करण्यात आला.

"सर्व दुःख हरून मनोकामना पूर्ण करणारी आई जय महाकाली"

कन्हान नदीच्या तीरावर वसलेले ऐतिहासिक रेल्वे पुलाची साक्ष देणारे आणि बंगालच्या कारागिरांना साक्षात दर्शन देणा-या सत्रापुरचे जय महाका ली मंदिर हे एक प्राचिन अत्यंत जागृत देवस्थान आहे. या देवी च्या दरबारात दर वर्षीप्रमाणे याही वर्षी चैत्र पंचमी सोमवार (दि.२३) मार्च २०२६ ला सका ळी १० वाजता जय महाकाली मंदीर सत्रापुर (कन्हान) येथे विधीवत घट स्थापना करून चैत्र नवरात्र उत्सवाची सुरूवात करण्यात आली. नऊ दिवस सकाळ, सायंकाळी पुजा, आरती व जस, भजन गायनासह (Chaitra Navratri Festival) विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून मंगळवार (दि.३१) मार्च २०२६ ला सकाळी १० वाजता मा. सनदजी गुप्ता यांचे हस्ते विधिवत पुजा अर्चना करून वाजा गाज्यासह कन्हान नदीच्या पावन पात्रात घटविसर्जन केल्यावर उपस्थित भाविकांना महाप्रसाद वितरण करून चैत्र नवरात्रौत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

आई महाकालीच्या प्रत्यक्ष साक्षात्काराने पुण्य झालेल्या या पावन भूमीत विदर्भ, नागपुर जिल्हयासह मध्य प्रदेश येथील दुर दरून भाविकांनी येऊन नतमस्तक होऊन आई महाकालीच्या दर्शनाचा लाभ घेऊन आपले जीवन सफल केले. (Chaitra Navratri Festival) नवरात्रौत्सवाच्या यशस्विते करिता जय महाकाली सेवा समिती, सत्रापुर (कन्हान) चे भक्त उत्तमराव दुरूगकर महारा ज, सचिव प्रकाश कडु, शरद डोणेकर, कैलास भिवगडे, उषा पात्रे, जेष्ट नागरिक संघ कन्हान सह परिसरातील भाविकांनी सहकार्य केले.

संबंधित सामग्री

सिगारेट ओढणाऱ्यांपासून सावध! ‘स्मोकर’जवळ थांबणेही धोकादायक...

सिगारेट ओढणाऱ्यांपासून सावध! ‘स्मोकर’जवळ थांबणेही धोकादायक...

India Smoking Deaths: सिगारेट ओढणारी व्यक्ती स्वतःच्या आरोग्याला धोका निर्माण करतेच; मात्र तिच्या आसपास असलेल्या धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनाही त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

Oct 06, 2026
तब्बल 40 कोटींची गाय! भारतीय वंशाच्या ‘वियाटिना-19’ची विक्रमी बोली

तब्बल 40 कोटींची गाय! भारतीय वंशाच्या ‘वियाटिना-19’ची विक्रमी बोली

Viatina-19 Cow Record: ब्राझीलमध्ये झालेल्या एका विशेष लिलावात भारतीय वंशाच्या नेल्लोर (ओंगोल) प्रजातीतील ‘वियाटिना-19’ या गायीने तब्बल 40 कोटी रुपयांची विक्रमी बोली, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Oct 06, 2026
धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि धर्मांतराविरोधात कठोर कायदा येणार?

‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि धर्मांतराविरोधात कठोर कायदा येणार?

West Bengal UCC: पश्चिम बंगालच्या राजकारणात समान नागरी कायदा म्हणजेच UCC लागू करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमध्ये लवकरच UCC लागू

Oct 05, 2026
‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

सुधारित Form 6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नसल्याचे CJI सूर्यकांत यांनी स्पष्ट केले. SIRच्या १४ निर्णयांवर याचिकेत सवाल; निवडणूक आयोगाला नोटीस.

Oct 05, 2026