Buldhana Accident

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रेलरला फॉर्च्यूनरची जोरदार धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून भरधाव फॉर्च्यूनर कारने समोर धावणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रेलरला फॉर्च्यूनरची जोरदार धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Buldhana Accident

बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीडजवळ दुर्घटना; दोन लहान मुले आणि चालक गंभीर जखमी, जालन्यात उपचार सुरू

बुलढाणा (Buldhana Accident) : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून भरधाव फॉर्च्यूनर कारने समोर धावणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारमधील दोन लहान मुले आणि चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही दुर्घटना बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड परिसरात समृद्धी महामार्गावर घडली. प्राथमिक माहितीनुसार, डॉ. सय्यद आसिफ सय्यद उमर हे पत्नी गुलसीतान बी आणि कुटुंबीयांसह नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे फॉर्च्यूनर कारने प्रवास करत होते.

प्रवासादरम्यान समोर धावणाऱ्या ट्रेलरला फॉर्च्यूनर कारची पाठीमागून जोरदार धडक बसली. या भीषण धडकेत डॉ. सय्यद आसिफ आणि त्यांच्या पत्नी गुलसीतान बी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघातात कारचा चालक तसेच कारमधील दोन लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. जखमींना तातडीने जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्यातील महामार्गांवरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गावरील ही आणखी एक गंभीर दुर्घटना ठरली आहे. या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतुकीवर परिणाम झाला होता.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026
निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

नाशिक धर्मांतर प्रकरणातील निदा खानसमोर वैवाहिक संकट. आठ महिन्यांची गर्भवती असताना पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून १६ ऑक्टोबरला कोर्टात हजेरी आहे.

Oct 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026