घोट बीएसएनएल सेवा

तीन दिवसांपासून बीएसएनएल सेवा ठप्प; नागरिक संतप्त

Ghot BSNL service: घोट येथील बीएसएनएल सेवा गेल्या तीन दिवसांपासून खंडित झाली आहे. वीज गेल्यानंतर नेटवर्क सुद्धा गायब होत आहे. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

तीन दिवसांपासून बीएसएनएल सेवा ठप्प; नागरिक संतप्त

Ghot BSNL service

 

“बीएसएनएल कार्यालय की डम्पिंग ग्राउंड?”, घोटकरांचा सवाल

वीज गेली की नेटवर्क गायब; वर्षभरापासून समस्या कायम

घोट (Ghot BSNL service) : घोट येथील बीएसएनएल सेवा गेल्या तीन दिवसांपासून पूर्णपणे खंडित झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधीच गेल्या वर्षभरापासून वीजपुरवठा खंडित होताच नेटवर्क बंद पडण्याची समस्या कायम असताना, आता सलग तीन दिवस सेवा ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. माहितीनुसार, सुमारे वर्षभरापूर्वी बीएसएनएल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी झाली होती. मात्र, अद्याप नवीन बॅटऱ्या बसविण्यात आलेल्या नाहीत. परिणामी, वीजपुरवठा खंडित होताच संपूर्ण नेटवर्क कोलमडते. याचा थेट परिणाम मोबाईल सेवा, इंटरनेट सुविधा आणि ऑनलाइन व्यवहारांवर होत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

विशेषतः विद्यार्थी, शेतकरी आणि व्यापारी वर्ग यांना या समस्येचा मोठा फटका बसत आहे. (Ghot BSNL service) ऑनलाइन शिक्षण, बँकिंग व्यवहार तसेच शासकीय सेवा यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान, बीएसएनएल कार्यालयाची स्थितीही अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक वर्षांपासून येथे स्थायी चौकीदार किंवा ऑपरेटर नसल्याने संपूर्ण कार्यालय बेवारस अवस्थेत आहे. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी टॉवरच्या बॅटऱ्या लंपास केल्या. मात्र, या गंभीर घटनेनंतरही संबंधित विभागाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.

कार्यालय परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे संपूर्ण परिसर डम्पिंग ग्राउंडसारखा दिसत असून स्वच्छतेचा पूर्ण अभाव जाणवतो. यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. घोट (Ghot BSNL service) व परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन नवीन बॅटऱ्या बसवाव्यात, सेवा त्वरित पूर्ववत सुरू करावी, कार्यालय परिसराची स्वच्छता करावी तसेच कायमस्वरूपी चौकीदार नेमून सुरक्षाव्यवस्था मजबूत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

संबंधित सामग्री

मोबाईल ग्राहकांना मोठा दिलासा! डेटा प्लॅनची सक्ती थांबणार; फक्त कॉलिंग-SMSचा पर्याय मिळणार..

मोबाईल ग्राहकांना मोठा दिलासा! डेटा प्लॅनची सक्ती थांबणार; फक्त कॉलिंग-SMSचा पर्याय मिळणार..

Mobile Recharge Plan: मोबाईल रिचार्ज करताना केवळ कॉलिंग आणि SMSची गरज असलेल्या ग्राहकांसाठी आता अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) दूरसंचार ग्राहक संरक्षण

Sep 22, 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये भूमिगत डक्टमध्ये दोन कामगारांचा मृत्यू; वर्षभरात एकाच ठिकाणी ५ बळी

पिंपरी-चिंचवडमध्ये भूमिगत डक्टमध्ये दोन कामगारांचा मृत्यू; वर्षभरात एकाच ठिकाणी ५ बळी

निगडी परिसरातील भूमिगत डक्टमध्ये काम करताना गुदमरल्याने दोन तरुण कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Aug 27, 2026
नकाशासाठी लढली लव्हलिना; मोदींकडून कौतुक

नकाशासाठी लढली लव्हलिना; मोदींकडून कौतुक

Winner Lovlina Borgohain: ग्लासगोमध्ये भारताच्या नकाशातील गंभीर चूक निदर्शनास आणून देणारी भारताची स्टार बॉक्सर आणि रौप्यपदक विजेती लव्हलिना बोरगोहेन हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक

Aug 10, 2026
सहा दिवसांपासून रुई-गोस्ता परिसरात 'मोबाईल' सेवा ठप्प; जिओचे नेटवर्क गायब 

सहा दिवसांपासून रुई-गोस्ता परिसरात 'मोबाईल' सेवा ठप्प; जिओचे नेटवर्क गायब 

Mobile Services Down: रूई - गोस्ता सह परिसरात गेल्या ६ दिवसांपासून एका आघाडीच्या खासगी दूरसंचार कंपनी जिओची मोबाईल नेटवर्क सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Jun 30, 2026
'चोर, चोर' ते अंडी आणि दगड फेक ; अभिषेक बॅनर्जींवरील हल्ला कसा घडला?

'चोर, चोर' ते अंडी आणि दगड फेक ; अभिषेक बॅनर्जींवरील हल्ला कसा घडला?

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसविरोधातील नाराजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आल्याचा दावा केला जात आहे.

May 31, 2026