विश्व हिंदू परिषद

बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रपतींना निवेदन; विविध मुद्द्यांवर कारवाईची मागणी

Vishwa Hindu Parishad: बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने विविध सामाजिक आणि सुरक्षा संबंधित मुद्द्यांवर लक्ष वेधून राष्ट्रपतींना कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली.

बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रपतींना निवेदन; विविध मुद्द्यांवर कारवाईची मागणी

Vishwa Hindu Parishad

मानोरा (Vishwa Hindu Parishad) : विश्व हिंदू परिषद व बजरंग दल मानोरा नगरच्या वतीने देशातील विविध सामाजिक व सुरक्षा विषयक मुद्द्यांकडे लक्ष वेधत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. तहसीलदारांच्या माध्यमातून हे निवेदन दि. २० एप्रिल रोजी पाठवण्यात आले असून, विविध घटनांबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.  

निवेदनात देशात वाढत चाललेल्या सामाजिक तणावाच्या पार्श्वभूमीवर काही गंभीर मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. ‘लव्ह जिहाद’ संदर्भातील प्रकरणे, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न तसेच काही शैक्षणिक संस्थांशी संबंधित तक्रारी यामुळे अंतर्गत सुरक्षितेवर परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या (Vishwa Hindu Parishad) संदर्भात केंद्र सरकारने कठोर कायदे करावेत, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय, सार्वजनिक व सरकारी जमिनीवरील अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. जबरदस्ती धर्मांतर रोखण्यासाठी देशभरात एकसमान कडक कायदा लागू करावा, तसेच समाजात वैमनस्य निर्माण करणाऱ्या घटनांवर कठोर कारवाई करावी, असेही नमूद करण्यात आले आहे.

जनजाती व अल्पसंख्याक भागांमध्ये होणाऱ्या कथित शोषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याची मागणी करत प्रशासनाने या (Vishwa Hindu Parishad) सर्व बाबींवर तातडीने लक्ष देऊन देशात शांतता व सामाजिक सलोखा कायम राखावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी निवेदन देताना विश्व हिंदू परिषद व बजरंग दलचे पदाधिकारी राम हेडा, करण ठाकूर, मनोज डाबरे, सचिन पडघान, पप्पू राठोड, सचिन राठोड, मयूर देशमुख, अनिकेत पाटील, प्रथमेश देशमुख, रोहन भारसाकळे, अनुपम पदमिगीरवार, हर्ष ठाकुर, वेदांत तिवारी, गोपाल कुरकुटे, सुजल चव्हाण, मानव खडसे, सवई राजपुरोहित, विवेक रत्नपारखी यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संबंधित सामग्री

आगीतील जखमी कर्मचार्‍यांना प्रत्येकी १ लाखाची मदत: नगराध्यक्षा रेखाताई बांगर

आगीतील जखमी कर्मचार्‍यांना प्रत्येकी १ लाखाची मदत: नगराध्यक्षा रेखाताई बांगर

Municipal President Rekhatai Bangar: शहरांमध्ये फटाक्याच्या गोदामाला आग लागून घडलेल्या घटनेत आगीत होरपळलेल्या जखमी नगरपालिका कर्मचार्‍यास प्रत्येकी एक लाखाची मदत नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम  बांगर

Oct 06, 2026
‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि धर्मांतराविरोधात कठोर कायदा येणार?

‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि धर्मांतराविरोधात कठोर कायदा येणार?

West Bengal UCC: पश्चिम बंगालच्या राजकारणात समान नागरी कायदा म्हणजेच UCC लागू करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमध्ये लवकरच UCC लागू

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
9/11 चा संदर्भ, विमानांना लक्ष्य करण्याची धमकी? फ्लायदुबई प्रकरणात नवा ट्विस्ट

9/11 चा संदर्भ, विमानांना लक्ष्य करण्याची धमकी? फ्लायदुबई प्रकरणात नवा ट्विस्ट

फ्लायदुबई विमानातील क्रॅश कटानंतर ओमानी को-पायलटवर गंभीर आरोप; जखमी भारतीय पायलट स्मित मच्छार यांनी विमान सुरक्षित उतरवल्याचा दावा.

Oct 04, 2026
निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

नाशिक धर्मांतर प्रकरणातील निदा खानसमोर वैवाहिक संकट. आठ महिन्यांची गर्भवती असताना पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून १६ ऑक्टोबरला कोर्टात हजेरी आहे.

Oct 04, 2026