महाराष्ट्रातील सर्व आश्रमशाळा संस्था चालकां नी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
कन्हान (Tribal Ashram School ) : आदिवासी आश्रमशाळा संस्था चालक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संघटनेचे राज्य व्यापी पंचवार्षिक अधिवेशन चिटणीस सेंटर, सिव्हिल लाईन, नागपुर येथे आयोजित करून महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळा संस्था चालकांच्या विविध प्रश्न, प्रलंबित मागण्या तसेच आश्रमशाळांच्या विकासा शी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
शनिवार (दि.२६) सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आदिवासी आश्रमशाळा संस्था चालक संघटनेचे राज्यव्यापी पंचवार्षिक अधि वेशनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री तथा नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच राज्य मंत्री आशिष जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
अधिवेशना मध्ये महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशा ळा संस्था चालकांच्या विविध प्रश्नांवर, प्रलंबित माग ण्यांवर तसेच आश्रमशाळांच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. संस्था चालकांच्या अडचणी शासनाच्या निदर्शनास आणुन देण्यासाठी आणि विविध प्रश्नांच्या प्रभावी पाठ पुराव्यासाठी या अधिवेशनात महत्त्वपुर्ण चर्चा होणार आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष राजेंद्र सरोदे, महसचिव किशोर वानखेडे तसेच माजी आमदार टेकचंद सावर कर यांनी महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आश्रमशाळा संस्था चालकांना या राज्यव्यापी पंचवार्षिक अधिवेश नास प्रामुख्याने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
आदिवासी आश्रमशाळा संस्था (Tribal Ashram School) चालकांची एकजुट अधिक मजबुत करण्यासाठी तसेच त्यांच्या विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वपुर्ण ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रा तील सर्व आदिवासी आश्रमशाळा संस्था चालकांनी शनिवार (दि. २६) सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता चिटणीस सेंटर, सिव्हिल लाईन, नागपुर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहुन अधिवेशन यशस्वी करावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.