अडाण नदी युवक मृत्यू

अडाण नदीत उडी घेतल्याने २२ वर्षीय युवकाचा मृत्यू!  

Adan River Youth Death: अडाण नदीजवळील एक दुरदैवी घटना: २२ वर्षीय युवकाने उडीचा चढाव केला आणि त्या वडिलांनी मुलाला बळपट्टीने वाचविण्याचा प्रयत्न करण्यावर स्वतः जखम झालेल्या.

अडाण नदीत उडी घेतल्याने २२ वर्षीय युवकाचा मृत्यू!  

Adan River Youth Death

 

अडाण नदी पुलावरील दुर्दैवी घटना! 

मानोरा (Adan River Youth Death) : तालुक्यातील अडाण नदीत कुपटी ( ता. कारंजा ) येथील २२ वर्षीय युवकाने  उडी घेतल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी १३ जून रोजी दुपारी घडली. मुलाला वाचविण्यासाठी नदीत धाव घेतलेल्या वडिलांनाही दुखापत झाली असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, संचित सुभाष मुंदे (वय २, रा. कुपटी) हा आपल्या वडील सुभाष मुंदे यांच्यासह शनिवारी मानोरा येथे गेला होता. दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास दोघेही परत येत असताना अडाण नदीजवळील पुलाजवळ त्यांनी दुचाकी थांबविली. त्यानंतर संचितने अचानक नदीपात्रात उडी घेतली. ही घटना घडताच वडील सुभाष मुंदे यांनी मुलाला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र प्रयत्न निष्फळ ठरले आणि या धावपळीत ते स्वत: जखमी झाले. (Adan River Youth Death) घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नदी पात्रात शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर सायंकाळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने संचितचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला.  

मृतदेह बाहेर काढल्यानंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात आली. (Adan River Youth Death) घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. युवकाने हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. तरुण वयात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कारंजा व मानोरा तालुक्यात शोककळा पसरली असून मुंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संबंधित सामग्री

कन्हान नदी पुलावरून १७ वर्षीय तरुणीची नदीत उडी

कन्हान नदी पुलावरून १७ वर्षीय तरुणीची नदीत उडी

Kanhan River Suicide: गालिळपूराचें १७ वर्षीय तरुणी एका नदी पुलावरून नदीत उडी घेऊन गेले. सायंकाळी तातडीन्या मित्रांच्याजवळच, आपदामित्र व पोलिसांच्या मदतीने जिव्याचा बचाव होऊन तरुणीचा जिव..

Aug 02, 2026