चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महसूल मंत्र्यांकडे निवेदन; तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन

क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांची चिखली तहसील कार्यालयातील दरबारात शेतकऱ्यांसह भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्न मांडले.

चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महसूल मंत्र्यांकडे निवेदन; तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन

Agriculture Subsidy

चिखली (Agriculture Subsidy) : क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांची चिखली तहसील कार्यालयातील दरबारात शेतकऱ्यांसह भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्न मांडले. यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणींवर प्रकाश टाकत, रखडलेले कृषी औजारांचे अनुदान तात्काळ देण्यात यावे, तसेच अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळावी, अशी मागणी करण्यात आली. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे अनुदान ऑनलाइन प्रक्रियेमुळे अडकून पडल्याने पात्र लाभार्थ्यांना त्वरित मदत मिळावी, अशीही भूमिका मांडण्यात आली.

तसेच पीएम किसान योजनेची संकेतस्थळे बंद असल्यामुळे अनेक वारस शेतकरी योजनेपासून वंचित राहत आहेत. नव्याने सातबारा तयार झालेल्या व वाटणी झालेल्या शेतकऱ्यांचा पीएम किसान तसेच सीएम किसान सन्मान योजनेत समावेश करून त्यांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

या सर्व मागण्यांवर महसूल मंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक भूमिका घेत, मागण्या न्याय्य असल्याचे सांगत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. संबंधित निवेदनावर त्यांनी निर्देश देत, त्यांच्या स्वीय सहाय्यकांमार्फत दोन दिवसांत कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले.

दरम्यान, या आश्वासनानंतर चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना लवकरच दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026