123rd Birth Anniversary

दलित मित्र समाजभूषण पंढरीनाथ पाटील यांचा १२३ वा जयंती उत्सव उत्साहात संपन्न

चिखलीत दलित मित्र समाजभूषण पंढरीनाथ पाटील यांचा १२३ वा जयंती उत्सव उत्साहात संपन्न; मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सत्यशोधक कार्याचे स्मरण केले.

दलित मित्र समाजभूषण पंढरीनाथ पाटील यांचा १२३ वा जयंती उत्सव उत्साहात संपन्न

123rd Birth Anniversary

चिखली : स्थानिक श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चिखली येथे समाजभूषण दलित मित्र पंढरीनाथ पाटील यांचा १२३ वा जयंती उत्सव रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख होते. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गजाननराव पुंडकर, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, कार्यकारणी सदस्य हेमंत दादा काळमेघ, सुरेशराव खोटरे, केशवराव गावंडे, सुभाषराव बनसोड, मा. प्राचार्य डॉ. पी. एस. वायाळ, निलेशजी गावंडे, आजीवन सदस्य मधुकरराव पाटील, अशोकराव पाटील, ॲड. कळसकार साहेब, संतोषराव पाटील, भास्करराव पाटील, मा. सत्यजित राऊत साहेब उपस्थित होते.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेब, मा. राहुलभाऊ बोंद्रे, तसेच प्रमुख वक्ते संशोधक व शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक डॉ. विजय भगत व सौ. कल्पना भगत उपस्थित होते.

सर्वप्रथम सर्व मान्यवरांनी समाजभूषण पंढरीनाथ पाटील स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांच्या समाधीस्थळी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर महामानवांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शालेय प्रशासनाच्या वतीने सर्व प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालय व महाविद्यालय समितीच्या वतीने श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंतकुमार चेके यांनी आपल्या प्रास्ताविकात जयंती उत्सवानिमित्त जिल्ह्यातील सर्व विद्यालयांमध्ये २० सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

पंढरीनाथ पाटील साहेब यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्था, रुजवलेले सत्यशोधक विचार आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांचा हा वारसा अखंडितपणे प्रवाहित ठेवण्याचे कार्य आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालये अविरतपणे करत आहेत. संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये मागेल त्याला प्रवेश देऊन विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण करणे हे विद्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे विचार त्यांनी प्रास्ताविकातून मांडले.

यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांनी पंढरीनाथ पाटील यांनी समाजप्रबोधन, सामाजिक समता आणि लोकसेवा यांना आयुष्यभर प्राधान्य दिले. इतरांसाठी शिक्षणाच्या वाटा खुल्या करणारे ते कर्मयोगी होते, असे प्रतिपादन केले.

त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व सत्यशोधक विचाराचे गाढे अभ्यासक मा. डॉ. विजय भगत यांनी आपल्या मनोगतातून ‘महामानवांचा वैज्ञानिक आणि भौतिकवादी दृष्टिकोन’ या विषयावर महाराष्ट्रातील कृषक समाजासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व पंढरीनाथ पाटील यांच्या योगदानाबद्दल उपस्थितांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले.

सत्यशोधक समाजाची आवश्यकता आणि पंढरीनाथ पाटील यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगताना त्यांनी जनतेने वेदांचा अभ्यास करून शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव करून घ्यावी, व्यवसायपूरक शिक्षण ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केले.

संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपभाऊ इंगोले यांनी दलित मित्र पंढरीनाथ पाटील हे खरे साहित्य-सांस्कृतिक दीपस्तंभ होते. त्यांनी समाजहितासाठी संघर्ष केला. त्यांच्या साहित्याने समाजाला दिशा दिली, त्यांच्या शैक्षणिक कार्याने नव्या पिढीला मार्ग दाखविला आणि त्यांच्या सत्यशोधक कार्याने वंचितांना आवाज मिळवून दिला, असे विचार मांडले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख, अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांनी अध्यक्षीय समारोपात व्यक्तीची खरी ओळख ही समाजजीवनात घडवून आणलेल्या परिवर्तनावरून होते, असे सांगितले. प्रतिकूल परिस्थितीमध्येही शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे साधन बनविणारे, वंचितांच्या प्रश्नांना आवाज देणारे आणि विवेकवादी विचार घडविणारे दलित मित्र पंढरीनाथ पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये बहुमूल्य असे कार्य केले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला संस्थेचे जिल्ह्यातील सर्व आजीवन सभासद तसेच अशोकराव चव्हाण, भास्करराव पाटील, शंतनुराव पाटील, प्रभूकाका बाहेकर, डॉ. प्रताप सिंह परिहार, अभ्यास शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनील घायाळ, डी.एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय पाडेन, श्री शिवाजी कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पडोळे, उपप्राचार्य नारळे, पर्यवेक्षक डी. एस. धांडे, गोलाईत मॅडम, सावजी सर, शेळके सर, शिक्षक प्रतिनिधी गजाननराव वायाळ सर, कनिष्ठ महाविद्यालयीन प्रतिनिधी हुसे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील आजी-माजी प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जयेश सावजी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. धांडे सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी दलित मित्र पंढरीनाथ पाटील यांच्यावर प्रेम करणारे बांधव तसेच शिव परिवारातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर जयंती उत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील सर्व कर्मचारीवृंदाने परिश्रम घेतले.

संबंधित सामग्री

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

Chikhli gangster Ishwar Dhanwate: शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाई सुरू ठेवली आहे. अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्या

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026